Thursday, April 25, 2024
Homeनाशिकफार्महाऊसवरील कार्यक्रमासाठी परवानगी आवश्यक

फार्महाऊसवरील कार्यक्रमासाठी परवानगी आवश्यक

नाशिक । प्रतिनिधी

जिह्यातील कोणत्याही फार्महाऊस, हॉटेल, रिसोर्ट, ढाबे अशा ठिकाणी कोणताही कार्यक्रम आयोजीत करतांना संबधीत विभागांसह पोलीसांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याच्या सुचना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी व्यावसायिकांना केल्या.

- Advertisement -

दरी मातोरी डीजे चालक अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी तातडीने जिल्ह्यातील फार्म हॉऊस, हॉटेल, रिसॉर्ट चालक व्यावसायिकांची बैठक आडगाव येथील पोलीस मुख्यालयात बोलावली होती. या बैठकीत त्यांनी विविध सुचना केल्या. नाशिक तालूक्यासह इगतपूरी, घोटी, वाडिवर्‍हे, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणच्या हॉटेल, रिसोर्ट फार्म हाऊसच्या मालकांनी हजेरी लावली.

यावेळी नाशिक जवळील दरी येथील शिवगंगा फार्म हाऊस मध्ये डीजे वादकांना झालेली मारहाण आणि त्यामुळे उदभवलेल्या समस्या आणि प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था परिस्थीती या विषयी माहिती देवून घटनेचे गांभिर्य समजवून सांगण्यात आले. अश्या घटना पून्हा होवू नये म्हणून मालक आणि व्यवस्थापकांनी घेण्याच्या दक्षतेबाबत मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या.

त्यामध्ये वरील सुचनांसह खासगी मालकीचे फार्म हाऊस इतर कोणालाही वापरायला देवू नये. मद्य परवाना असलेल्या व्यावसायीकांनी अन्य कोणतेही मादक पदार्थाची विक्री करूनये परवाना नसेल तर ग्राहकांना बेकायदाशीर मद्यप्राशन करण्यास रोखावे, कार्यक्रमाची वेळ मर्यादा काटेकोरपणे पाळावी, हॉटेल – रिसोर्ट मध्ये थांबणार्‍या व्यक्तींच्या सविस्तर नोंदी ठेवाव्यात

त्यात ग्राहकाचे नाव वय पत्ता फोन, वाहन नंबर आणि ओळखपत्र घेवूनच थांबण्यास परवानगी द्यावी, हॉटेल रिसोर्टमध्ये मोक्याच्या ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित कराव्यात, आपआपल्या रिसोर्ट आवारातच वाहन पार्किंगची सोय करावी, बाहेर रस्त्यावर पार्किंग करून वाहतूकीस अडथळा करू नये अनेकदा चोरटे पार्किंगमध्ये घुसून वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉप, मोबाईल, मनी पर्स आदीं वस्तू चोरतात त्याला आळा घालण्यासाठी पुरेशा संख्येने सीसीटिव्ही आणि सुरक्षा रक्षक नेमावेत अश्या अनेक प्रकारच्या सुचना देण्यात आल्या.

सुचनांचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाईचाही इशारा उपस्थीत व्यावसायीकांना देण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने व्यावसायीक आणि पोलीस अधिकारी उपस्थीत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या