Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रविवारी पेलेटोन सायकल राईड

Share
रविवारी पेलेटोन सायकल राईड; Peleton Cycle Ride on Sunday

स्पर्धेचे नववे वर्ष :  सायकल चळवळीला बूस्ट

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकला सायकलची राजधानी मानले जाते. सायकल चळवळ वाढीस लागावी यासाठी सायकलिस्ट्स फाऊंडेशन हे महापालिका व स्मार्ट सिटीसोबत प्रयत्न करत आहे. यंदाच्या वर्षाची सर्वात मोठी सायकल राईड संबोधल्या जाणार्‍या ‘पेलेटोन -२०२०’ येत्या रविवारी नाशकात आयोजित करण्यात आल्याची माहिती सायकलीस्टचे अध्यक्ष रत्नाकर यांनी आज दिली. ते सायकलिस्ट कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी उपाध्यक्ष श्रीकांत जोशी , अ‍ॅड. वैभव शेटे, सरचिटणीस नंदकुमार पाटील, योगेश शिंदे, मनीषा रौंदळ, स्नेहल देव, यामिनी खैरनार यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

सध्या शहरात रविवार हा सायकल वार असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यंदाचा नववा ‘बजाज स्टील इंडस्ट्रीज प्रायोजित पेलेटोन-२०२०’ आयोजित करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. यामध्ये स्पर्धा तसेच हौशी सायकलिस्टसाठी राईड पार पडणार आहे. या राईडची सुरुवात येत्या रविवारी (दि. १६) ग्रीन राईड, कॉर्पोरेट राईड आणि कीड्स राईड या प्रकारात पार पडणार आहे. याचे अंतर अनुक्रमे ५ व १० किलोमीटरचे असेल असे सांगण्यात आले आहे. तसेच स्पर्धेसाठी हे अंतर १५ किलोमीटर शालेय विद्यार्थ्यांसाठी व ५० कि.मी. खुल्या गटासाठी पार पडणार आहे.

शनिवारी (दि. १५) १८ कि.मी. पेलेटोन टीम चॅलेंज या प्रकारात पार पडणार आहे. ही स्पर्धा सर्व गटासाठी खुली असून यामध्ये विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. स्थानिक खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी सायलीस्ट प्रयत्नशील असून स्थानिकांसाठी वेगळे धोरण आखण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी सहभाग नोंदविणार्‍या पहिल्या १०० स्पर्धकांना प्रिमियम सायकलिंगची जर्सीदेखील देण्यात येणार आहे.
नाशिक पेलोटोनमध्ये प्रथमच सायकलिंग स्पर्धेसाठी टाईमिंग चीपचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. तसेच सर्व स्पर्धा त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोमपासून सुरु होतील. बक्षीस वितरण कार्यक्रम ठक्कर डोम येथे रविवारी (दि. १६) सकाळी ११ वाजता सिनेअभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सायकल चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सायकलीस्ट फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. ही मोहिम आरोग्य, पर्यावरण आणि खेळ या तिनही आघाड्यांवर पुढे जावी आणि प्रत्येकजण यात सहभागी व्हावे हेच या मोहिमेतून अपेक्षित आहे.

रत्नाकर आहेर, अध्यक्ष, सायकलीस्ट फाऊंडेशन

नॅबचा वार्षिक उपक्रम
नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड यांचा प्रेमाचा संदेश देणारा वार्षिक उपक्रम या स्पर्धेदरम्यान होणार आहे. या उपक्रमात पन्नासहुन अधिक दृष्टीहिन व बहुविकलांग मुलं, मुली सहभागी होणार आहेत.

अशी असेल पेलोटोन सायकल राईड

पाच किमी किडस् राईड ः ठक्कर डोमपासून सुरुवात जेहान सर्कलपासून पुन्हा ठक्कर डोम.

दहा किमी स्पर्धा ः ठक्कर डोम-जेहान सर्कल-गंगापुर नाका-आहिरराव कलर लॅब-पुन्हा ठक्कर डोम.

८० किमी स्पर्धा ः त्र्यंबक रोडवर घेण्यात येणार असून यासाठी ठक्कर डोम- पिंपळद-कश्यपी डॅम-गिरणारे-महिरावणी ठक्कर डोम समारोप.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!