Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सराईत संदेश पगारे स्थानबद्ध

Share
सराईत संदेश पगारे स्थानबद्ध; Sandesh Pagare arrested

नाशिक |.प्रतिनिधी

पंचवटीतील सराईत संदेश उर्फ काळू सुधाकर पगारे याला पाेलीस आयुक्तांनी स्थानबद्ध केले आहे. संदेशने पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी कृत्य करून सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत केले होते. त्याच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्याचे गैरकृत्य सुरूच होते. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्याच्याविरुध्द एमपीडीए कायद्यान्वये दि. १७ रोजी स्थानबध्दतेचे आदेश काढले. त्यानुसार त्याला मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

त्याच्यावर दरोड्याची पूर्वतयारी, दरोडा टाकण्यांसाठी एकत्र जमणे, घातक हत्यारांनी दुखापत करणे, प्राणघातक शस्त्रांसह दंगा करणे, चोरी, खुनाचा प्रयत्न करणे, विना परवाना हत्यार बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे,असे गंभीर गुन्हे पंचवटी पाेलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच सार्वजनीक जनजीवन विस्कळीत करणारे आणखी काही सराईत पोलीस आयुक्तांच्या
रडारवर असून आजपर्यंत १३ इसमांना स्थानबध्द करण्यात आलेले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!