Type to search

Featured नाशिक

जुन्या ‘पंचवटी’साठी प्रवासी संघटना आक्रमक

Share

नाशिकरोड | प्रतिनिधी

पंचवटी एक्स्प्रेसला नवीन कोच देऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. मात्र ही एक्सप्रेस प्रवाशांच्या आजारात वाढ करत असून या नव्या गाडीमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. म्हणून आम्हाला पुन्हा जुनीच गाडी द्या किंवा संरचनेत लवकरात लवकर बदल करून द्या, लोकलचा मुद्दा निकाली काढा, नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करा, या मागणीसाठी प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकाला भेट दिलेले जनरल मॅनेजर डी.के. शर्मा यांना साकडे घातले.

नाशिक रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पाटील आणि गोरख चौधरी यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नासिकरोड रेल्वेस्थानकावर आलेले रेल्वेचे भुसावळ डिव्हिजनचे जनरल मॅनेजर डी.के. शर्मा यांना रेल्वेच्या प्रवाशांना मिळणार्‍या सोयी सुविधांविषयी साकडे घातले.

यावेळी पंचवटी एक्सप्रेस वेळेवर सोडा नियोजित ठिकाणापर्यंत पंचवटी वेळेवर पोहोचवा याच्यासह नवीन गाडीची आसन रचना बदला यासाठी जनरल मॅनेजर यांना साकडे घालण्यात आले यावेळी नाशिक कल्याण लोकल चे प्रवाशांना जे गाजर दाखवले आहे ते प्रत्यक्षात कृतीत कधी उतरणार याविषयी शर्मा यांना प्रवासी संघटनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी प्रश्नांचा भडीमार केला.

यावेळी रेल्वेचे आरपीएफचे पोलीस निरीक्षक एन.व्ही. गुहिलोत, स्टेशन प्रबंधक एस.के. शर्मा यांच्यासह रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!