Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

बैलाने धक्का दिल्याने विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू

Share

पंचाळे / वार्ताहर

बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेलेल्या महिलेला  बैलाने धक्का दिल्याने पाण्याने भरलेल्या १५ फूट खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि.२२ दुपारी सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे घडली.

सविता मच्छीन्द्र सैंद्रे (२१) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. दुपारी ३ वाजेच्या सुमारास उजनी रस्त्यालगत ठाकूर यांच्या शेतातील शेततळ्याशेजारी खोदलेल्या खड्ड्याकडे घेऊन गेल्या होत्या, .यावेळी एका बैलाने धक्का मारल्याने त्या १५ फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडल्या . यावेळी सोबत असलेल्या तीन लहान मुलींनी आरडाओरड करत बाजूच्या शेतात बाजरी सोंगणाऱ्या शेतकऱ्यांकडे धाव घेतली. तेथे घडला प्रकार सांगितल्यावर हे शेतकरी मदतीसाठी धावले. सविता यांचा पती व दीर काही अंतरावर शेतात मेंढ्या चारत होते. ते देखील धावत आले.

सोमनाथ सैंद्रे यांनी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उडी मारून सविता यांना  बाहेर काढले. मात्र नाकातोंडात पाणी गेल्याने सविता यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. रवींद्र जगताप यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची खबर दिली . सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी. डी. बलक, पोलीस कॉन्स्टेबल गौरव सानप व सुनील ढाकणे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सिन्नरच्या नगरपालिका दवाखान्यात पाठवले. मयत सवितांचे तालुक्यातीलच हिवरगाव येथील माहेर असून दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!