Thursday, April 25, 2024
Homeनाशिकऑनलाईन रोजगार मेळाव्यात १६५१ उमेदवारांचा सहभाग

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात १६५१ उमेदवारांचा सहभाग

सातपूर। प्रतिनिधी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्यामार्फत ऑनलाईन पध्दतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजन केला असून यामधील मुलाखत व्हिडीओ कॉन्फरन्स तसेच मोबाईल दूरध्वनी द्वारे घेण्यात येत आहेत.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यामुळे मागील काही दिवसांपासून बंद असलेले कारखाने व औदयोगिक आस्थपणा हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. या औद्योगिक आस्थापनांची मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने हा ‘ऑनलाईन रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला.

या मेळाव्यामध्ये नाशिकमधील तापरीया टूल्स, हिन्दुस्थान युनिलिव्हर लि. (मुसळगांव), ग्लेनमार्क फार्मासिटीकल्स (सातपूर), महिंद्रा ईपीएस, औरंगाबाद येथील नरसिम्हा ऑटो कंपोनेन्टस प्रा.लि. (वाळुज), पालघर जिल्ह्यातील विराज प्रोफाइल्स लि. (तारापूर एमआयडीसी) या कंपन्यांनी सहभाग घेतला. या कंपन्यांची १११५ रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

पहील्यांदाच आँनलाईन पद्धतीने रोजगार मेळाव्यासही उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असुन एकूण १६५१ उमेदवारांनी या मेळाव्यात सहभाग नोंदविला आहे.

१९६ मुलाखती पूर्ण

प्रतिसाद दिलेल्या उमेदवाराच्या व्हिडीओ कॉन्फरन्स तसेच मोबाईल दूरध्वनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने मुलाखतीं घेण्यात येत असुन १९६ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असुन ५८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या