Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकएस एम बी टी फार्मसी महाविद्यालयामध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम

एस एम बी टी फार्मसी महाविद्यालयामध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम

शेनीत । प्रतिनिधी

एस एम बी टी डिप्लोमा फार्मसी महाविद्यालय धामणगाव येथे करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मागील २५ मार्च पासून ऑनलाईन अभ्यासक्रम चालू आहे

- Advertisement -

युट्युब व्हाट्सएप ग्रुप झुमच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे लेक्चर, गुगल क्लासरूम या द्वारे हे अध्ययन चालू असल्याची माहिती प्राचार्य डॉ. योगेश उशीर यांनी दिली. जगभर कोरोनाने थैमान घातले असताना सर्वच शाळा, कॉलेज बंद असून अचानकच सर्वांना सुट्ट्या दिल्याने शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अभ्यासक्रम काही महाविद्यालयाचा अपूर्ण होते. तर सर्वांच्याच परीक्षा बाकी आहेत. घरी बसून विद्यार्थी अभ्यासक्रमापासून दूर जाऊ नये त्याचा वेळ मार्गी लागावा व शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अतिशय नियोजनबध्द आणि तंत्रशुद्ध पध्दतीने सर्व विषयाची मांडणी प्रा. सूर्यवंशी यांनी केली.

विद्यार्थ्यांनी या नवीन अध्ययन पध्दतीस चांगला प्रतिसाद दिला. नवनवीन अध्ययन व्हिडीओ बनवून प्राध्यापकांनी युट्युब ला टाकुन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या. गुगल टॉक च्या माध्यमातून विविध प्रश्नमंजुषा ही घेण्यात आल्या. ई-मेल च्या माध्यमातून विविध विषयांच्या नोट्स देण्यात आल्या. अशाप्रकारचे अध्ययन महाविद्यालय सुरू होण्यापर्यंत कार्यरत राहील यासाठी प्रा. कोचर ,प्रा. रुपारेल, प्रा. तांबे ,प्रा. तिवारी व प्रा. गरूड आदी प्रयत्नशील आहेत.

अतिशय उत्फुर्त प्रतिसादामुळे आम्ही प्राध्यापक अशा अध्ययनास लॉकडाऊन संपेपर्यंत तयार आहोत, शिवाय पालकही दुजोरा देत आहे. असे  प्राचार्य डॉ. योगेश उशीर यांनी या वेळी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या