Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगुणपत्रिकांवर आता श्रेणीसह टक्केवारीही

गुणपत्रिकांवर आता श्रेणीसह टक्केवारीही

एकाच नमुन्यात मिळणार गुणपत्रिका

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

विद्यापिठांच्या गुणपत्रिका वेगवेगळ्या नमुन्यांत देण्यात येतात. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवरही होत असल्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना गुणपत्रिका एकाच नमुन्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता विद्यापिठांच्या गुणपत्रिकांवर श्रेणीसह (ग्रेड) टक्केवारीही द्यावी लागणार आहे.

राज्यातील बिगरकृषी विद्यापिठांतून पदवी घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी अर्ज करतात. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी सेलच्या माध्यमातून होतात. मागील वर्षी प्रवेश प्रक्रियेवेळी प्रत्येक विद्यापिठाची गुणपत्रिका वेगवेगळी असल्याने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात गोंधळ झाला होता.

काही विद्यापिठांच्या गुणपत्रिकांवर केवळ श्रेणी दर्शवण्यात आली होती. त्यामुळे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना टक्केवारी नमूद असलेली गुणपत्रिका मिळवण्यासाठी विद्यापिठात फेर्‍या माराव्या लागल्या होत्या. त्यामुळे आता राज्यातील विद्यापिठांनी एकाच नमुन्यात गुणपत्रिका देण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांनी दिले आहेत. या संदर्भात कुलगुरूंची बैठक घेऊन सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. विद्यापिठांनी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘ग्रेड’ व गुणांची टक्केवारी देणे अनिवार्य असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या