Saturday, May 11, 2024
Homeनगरबाह्यवळण रस्त्यावर खड्ड्यात गाडी अडकल्याने 7 तास वाहतूक ठप्प

बाह्यवळण रस्त्यावर खड्ड्यात गाडी अडकल्याने 7 तास वाहतूक ठप्प

पिंपरी निर्मळ (वार्ताहर) –

राहाता शिर्डी शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पिंपरी निर्मळ येथून बाह्यवळण रस्ता सुरू करण्यात आला. दुरूस्तीअभावी

- Advertisement -

या रस्त्याची प्रंचड दुर्दशा झाली असुन या खड्ड्यामध्ये कंटेनर फसल्याने बाह्यवळण रस्त्यावर तब्बल सात तास वाहतुक कोंडी होवून दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नगर मनमाड रस्त्यावरील वाहतुकही सकाळी दोन तास बंद झाली होती.या वाहतुक कोंड़ीमुळे प्रवाशांसह ग्रांमस्थाना प्रंचड त्रासाला सामोरे जावे लागले.

राज्य सरकारने कोल्हार-कोपरगाव चौपदरी रस्ता तसेच राहाता, शिर्डी शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पिंपरी निर्मळ ते सावळीविहीर असा 23 किमीचा रस्ता सुप्रीम या खाजगी कंपनीच्या माध्यमातून केला आहे. या बाह्यवळण रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून डांबर निघुन गेले आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याचा पाया पक्का नसल्याने नुकत्याच होत असलेल्या अवकाळी पावसामुळे या खड्ड्यामध्ये रविवारी पहाटे तिनच्या दरम्यान कंटेनर (एचआर-38 झेड 3623) फसल्यामुळे संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. जवळपास सात तास या रस्त्यावरील वाहतुक बंद झाली होती. त्यामुळे दोनही बाजुला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिर्डी मार्गे जड वाहने तात्पुरत्या स्वरूपात वळविणे शक्य होते. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सकाळी दहा वाजेपर्यत हा निर्णय न झाल्याने नगर मनमाड रस्त्यावरही ट्रॅफ्रीक जाम होवुन पिंपरी निर्मळ चौक जवळपास वाहतुकीसाठी दोन तास बंद झाला. रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी, लहान वाहनधारक, एसटी बस वाहतुकीला याचा फटका बसला. वस्त्यांवरून दुध टाकण्यासाठी येणार्‍या ग्रामस्थांची ससेहोलपट झाली. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पा. यांच्या सुचनेनंतर सकाळी दहा वाजता थोपलेली वाहतुक शिर्डी राहाता मार्गे वळविण्यात आल्यानंतर वाहतुक हळुहळु सुरळीत झाली. बाह्यवळण रस्त्याची दुरूस्ती होईपर्यत जड वाहनांची रात्रीची वाहतुक राहाता शिर्डी मार्गेच सुरू ठेवावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक घोरपडे यांचे सह ग्रांमस्थानी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या