मनपा हद्दीतील ४ प्रतिबंधित क्षेत्रात आयुक्त राधाकृष्ण गमे यांची वैद्यकीय पथकासह पाहणी

मनपा हद्दीतील ४ प्रतिबंधित क्षेत्रात आयुक्त राधाकृष्ण गमे यांची वैद्यकीय पथकासह पाहणी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगर पालिका हद्दीतील ४ प्रतिबंधित क्षेत्रात मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वैद्यकीय पथकासह पाहणी करून त्या ठिकाणी विविध प्रकारचे कामे करण्याचे आदेश आरोग्य विभाग, आरोग्य वैद्यकीय विभाग व विभागीय अधिकारी यांना दिले. नाशिक महानगरपालिका हद्दीत ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर शहरातील ४ भागातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

त्यामधील मालपाणी सेफ्रॉन,पाथर्डी फाटा,बुरकुले हॉल जवळील उत्तम नगर, हिरे शाळेजवळ सावता नगर व सातपूर मधील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी या प्रतिबंधित क्षेत्रात मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वैद्यकीय पथकाबरोबर जाऊन पाहणी केली तसेच त्याठिकाणी असणारे पोलीस अधिकारी,मनपाचे आरोग्य,वैद्यकीय अधिकारी,आशा सेविका, विभागीय अधिकारी यांना विविध प्रकारच्या कामाच्या सूचना यावेळी दिल्या.तसेच या भागात कार्यरत असणारे आरोग्य वैद्यकीय विभागाचे कर्मचारी यांचे भोजन व्यवस्था,औषधाचा पुरवठा, पथकाद्वारे वैद्यकीय तपासणी करणे आदीच्या नियोजना बाबतची माहिती घेतली.

जो परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे त्या परिसरातील रहिवाशांना निश्चित केलेल्या कालावधीत कुणाला येथून बाहेर जाता येणार नाही अथवा बाहेरून याठिकाणी येता येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूची निकड भासू नये यादृष्टीने भाजीपाला,दूध या सारख्या वस्तू त्याच ठिकाणी उपलब्ध होतील या दृष्टीने समन्वय करून व्यवस्था करण्याबाबत सूचित करण्यात आले.

या ४ ही प्रतिबंधित क्षेत्रात औषध फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून घरोघरी जाऊन परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात यावी.प्रतिबंधित क्षेत्रात ज्या ठिकाणी उत्तम जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्याची व्यवस्था करावी.शासनाच्या सूचनेप्रमाणे रुग्णावर उपचार करावेत अश्या विविध सूचना मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी दिल्या.या पहाणीच्या वेळी परिसरातील नगरसेवक मा.सुधाकर बडगुजर,हर्षा बडगुजर,मुकेश शहाणे, रत्नमाला राणे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी तसेच परिसरातील रहिवाशी यांच्याशी संवाद साधला.

यावेळी पाहणी दौऱ्यात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र त्रम्बके,सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अजिता साळुंखे,डॉ. छाया साळुंखे,डॉ.योगेश कोशिरे, उपअभियंता ए.जे.काझी, विभागीय अधिकारी संदेश शिंदे, लक्ष्मण गायकवाड, उप अभियंता संजय पाटील, रजपुत विभागीय स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे आदी उपस्थित होते.

नाशकात सामाजिक प्रादुर्भाव नाही, शहरात बाहेरून येणाऱ्या रुग्णांमुळे प्रादुर्भाव वाढत असून याबाबत पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात येणार असून बाहेरून येणारे नागरिकांना थोपविणे ही काळाची गरज आहे. बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांना अटकाव केल्यास शहरात प्रादुर्भाव होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचा दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच मालेगाव मध्ये पोलिस कर्मचारी अथवा शासकीय कर्मचारी कार्यरत आहेत त्यातील जे कोरोना संशयित झाले असून त्यांना महापालिकेच्या माध्यमातून मदत केली जात असून त्यांना डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जात आहे व त्यांच्यावर उपचार केले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com