Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

महापालिकेत महाशिवआघाडीचा प्रयोग सुरु; सेनेच्या हालचाली वेगात; भाजपाची दमछाक

Share
करोनासंदर्भात प्रशासनाकडून पूर्वतयारीवर भर : राधाकृष्ण गमे; Preparation by the administration regarding the corona: Radhakrishna Game

 नाशिक । प्रतिनिधी

राज्यात भाजपाला दूर ठेवत गठीत झालेल्या महाशिवआघाडीची पुनरावृत्ती नाशिक महापालिकेत सुरू झाली असुन शिवसेनेचा भगवा फडकाविण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रस, कॉग्रेस व अपक्षाचे एकमत झाल्याने सेनेकडुन वेगवान हालचाली सुरू झाल्या आहे. मनसेनेत दोन गट असले तरी त्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याचे वृत्त असुन यावर उद्या होणार्‍या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान बहुमताचा आकडा असतांना केवळ फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या सत्ताधारी भाजपाची मोठी दमछाक सुरू झाली आहे. बाळासाहेब सानप समर्थकांचा आकडा पंधरा पर्यत जाणार असल्याच्या चर्चेने भाजपाची मोठी धावपळ सुरू झाली आहे.

महापालिकेत सत्ताधारी भाजपाकडे बहुमताचा ६५ असा आकडा आहे. मात्र माजी आ. बाळासाहेब सानप हे शिवसेनेत गेल्यामुळे त्यांचे समर्थक नगरसेवक फुटणार असल्याच्या शक्यतेने भाजपासमोर मोठे आव्हान उभे झाले आहे. पक्षांतर बंदी कायद्याने फुटणार्‍या नगरसेवकांचे पद जाणार असल्याने मोठी जोखीम संबंधीत नगरसेवक उचलणार नसल्याचे सांगितले जात आंहे. यामुळे महापालिकेवर भाजपाचीच सत्ता येणार असल्याचा दावा भाजपाकडुन केला जात आहे. तर सत्तेपासुन भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यातील महाशिवआघाडीचा प्रयोग महापालिकेत शिवसेनेकडुन केला जात आहे.

नाशिक महापालिकेत भाजपानंतर शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष (आरपीआय सह एकुण नगरसेवक संख्या ३५) आहे. राकॉ. ६, कॉग्रेस ६, मनसेना ५ व अपक्ष ३ असे बलाबल असुन हे सर्व शिवसेनेच्या पाठीशी एकत्र आल्यास त्यांचे संख्याबळ ५५ होणार आहे. त्यांना बहुमतांसाठी केवळ ७ नगरसेवकांची गरज आहे. बहुमतांचा आकडा माजी आ. बाळासाहेब सानप यांच्याकडुन पुर्ण केला जाणार असुन आज त्यांच्या कॅम्प मध्ये १२ नगरसेवक असल्याचा दावा सेनेकडुन केला जात असल्याने सध्या तरी महापालिकेवर महाशिवआघाडीचा महापौर होणार हे निश्चित मानले जात आहे.

नाशिक महापालिकेत सत्ताधारी भाजपाकडे ६५ नगरसेवक असुन हा आकडा बहुमतापेक्षा तीन नगरसेवकांनी जास्त आहे. याच बहुमताच्या जोरावर माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी महापौर पद राखण्यासाठी व्युहरचना सुरू करीत आपले बहुसंख्य नगरसेवकांना सहलीसाठी रवाना केले आहे. सहलीसाठी गेलेल्या नगरसेवकांचा आकडा ४१ असल्याचे सांगण्यात येत असुन उर्वरित नगरसेवक हे उद्यापर्यत सिधुदुर्ग येथे जाणार आहे. याठिकाणी उद्या (दि.१८)महाजन बैठक घेणार असुन संभाव्य फुट भरुन काढण्यासाठी आणि बहुमतांचा आकडा गाठण्यासाठी सर्व पातळीवरील प्रयत्न केले जाणार आहे.

भाजपात उमेदवारीसंदर्भात दोन मत प्रवाह असले तरी यात साम, दाम व दंडाची निती बरोबर सभागृह चालविण्याची क्षमता तपासून उमेवारी अंतीम केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याकरिता भाजपाकडुन मतदानाच्या दिवशी सकाळीच महापौरपदाचा उमेदवार घोषित करण्याची व्युहरचना करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. इच्छुकांतील माजी – आजी स्थायी सभापती यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा असून दिनकर पाटील, सतिश कुलकर्णी व शशीकांत जाधव यांची नावे सर्वात पुढे आहे. मात्र या पक्षाकडुन अजुन तिसरे नाव पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिवसेनेकडुन महापौर पदाच्या उमेदवारीसाठी अजय बोरस्ते व सुधाकर बडगुजर यांच्या नावाची चर्चा असून या इच्छुकांसह संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, बाळासाहेब सानप, शिवसेना पदाधिकार्‍यांकडुन महापालिकेवर भगवा फडकाविण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहे. यात इच्छुक उमेदवार व पदाधिकार्‍यांनी राकॉ., कॉग्रेस, मनसेना व अपक्षांसोबत प्राथमिक बैंठक घेतल्यानंतर त्यांनी राज्यातील महाशिवआघाडीच्या धर्तीवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर आता येणार्‍या दोन तीन दिवसात महापौर वगळता शिल्लक अडीच वर्षात स्थायी सभापती, सभागृह नेता, शिक्षण सभापती, स्थायी सदस्य, विषय समिती, प्रभाग सभापती – उपसभापती यांच्या वाटपाचे सुत्र ठरविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसकडुन देण्यात आली.

मनसेनेचे स्थानिक पदाधिकारी मात्र महाशिवआघाडीला समर्थन देण्याच्या निर्णयाप्रत पोहचले असल्याचे सांगण्यात येत आहे. महाशिवआघाडीचा महापौर करण्यासाठी महत्वपुर्ण भूमिका पार पाडण्यासाठी पुढे आलेले बाळासाहेब सानप यांच्या संपर्कात बहुमताचा आकड्याच्यावर जाईल इतके नगरसेवक असल्याचा दावा सेना नेते करीत आहे. असे असले तरी कोणाकडे प्रत्यक्ष संख्याबळ किती ? याचे उत्तर २२ तारखेला सभागृहात स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी – कॉग्रेसचे सेनेला समर्थन
आज सकाळी कॉग्रेस पदाधिकारी – नगरसेवकांची बैठक होऊन यास सर्वानी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. विशेषत: या बैठकीसाठी कॉग्रेस गटात नोंदणी केलेल्या अपक्ष उमेदवार विमल पाटील या देखील हजर होत्या. यात कॉग्रेसकडुन महाशिवआघाडी प्रमाणे राष्ट्रवादी कॉग्रेस बरोबर प्राथमिक चर्चा करुन शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भातील अंतीम निर्णय घेण्याचे आजच्या बैठकीत ठरविण्यात आले. याबैठकीनंतर सायंकाळी राष्ट्रवादी कॉग्रेससोबत कॉग्रेसची बैठक होऊन सेनेच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

मनसेनेची उद्या नाशिकला बैठक
मनसेनेकडुन सेनेला पाठींबा देण्यासंदर्भात दोन मत प्रवाह असल्याने आज माजी महापौर मुर्तडक व सलीम शेख यांच्यासह पदाधिकार्‍यांनी मुंबईत जाऊन पक्ष प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नाशिक महापालिकेतील स्थितीची माहिती देतांनाच याठिकाणी महाशिवआघाडीचा प्रयोग सुरू असल्याची माहिती देण्यात आली. यावर ठाकरे यांनी आपण 21 तारखेला निर्णय देऊ असे सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर उद्या मनसेना नगरसेवकांची स्थानिक नेते – पदाधिकारी यांच्यासोबत स्वतंत्र बैठक होत आहे. त्यानंतर मनसेनेची राकॉ. व कॉग्रेस पदाधिकार्‍यांसोबत चर्चा होणार आहे.

सेना नगरसेवकांची आज मुंबईत बैठक
शनिवारी मुंबईकडे रवाना झालेले शिवसेना नगरसेवक एका हॉटेल थांबले असुन आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनामुळे त्यांच्यासोबतची सेना नेत्यांची बैठक होऊ शकली नाही. मात्र उद्या (दि.१८) सर्व नगरसेवकांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहे. याच बैठकीत नाशिक महापालिक महाशिवआघाडीवर शिक्कामार्तब होणार असल्याची माहिती शिवसेनेकडुन देण्यात आली.

 

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!