Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

भाजपाच्या हातून महापौर पद निसटण्याची शक्यता; महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलणार?

Share
महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक; तिघांना सक्तमजुरी Latest News Nashik Youth Father Looted for Six Lakhs Assuring Job

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या गटाला विधानसभा निवडणुक निकालानंतर ग्रहण लागणार असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे. यात भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसवासी झालेले आ. बाळासाहेब सानप यांना मानणारे पंचवटी व नाशिकरोड विभागातील भाजपाचे नगरसेवक पक्षातून फुटून दुसरा गट स्थापन करण्याची चाचपणी सुरू असल्याची चर्चा असुन असे झाल्यास महापालिकेतील राजकिय समिकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने याची पोटनिवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक शहरात अनेक राजकिय समिकरणे बदले गेले आहे. यात भाजपाचे विद्यमान आ. बाळासाहेब सानप यांना पक्षाकडुन उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये जात उमेदवारी केल्याने भाजपाला पंचवटीत मोठा धक्का बसला आहे.

पालकमंत्री गिरीष महाजन यांचे कट्टर समर्थक असलेले आ. सानप यांना भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणुन नाशिकरोड व पंचवटीतील सुमारे १२ ते १५ भाजपा नगरसेवक एकत्र आले होते. यावरुन सानप यांना मानणारा भाजपात मोठा गट आहे.

याच गटाकडुन छुप्या पध्दतीने विधानसभा निवडणुकीत घड्याळासाठी काम करण्यात आल्याची चर्चा आता बाहेर आली आहे. तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सानपांसाठी काम केल्याचे सांगितले जात आहे. यावरुन भाजपासमोर घड्याळाने तगडे आव्हान उभे केले असल्याचे सांगितले जात असल्याने यात विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याचे उत्तर गुरुवारी (दि.२४) रोजी मिळणार आहे.

मात्र निकाल काही लागला तरी महापालिकेतील राजकिय समिकरणे बदलणारच, असे सानप समर्थकांकडुन आता सांगितले जात आहे. याचे परिणाम महापौर निवडणुकीच्या अगोदर पाहायला मिळणार आहे.

महापालिकेच्या १९९५-९६ च्या महापौर निवडणुकीत अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांनी अपक्ष असतांना बाजी मारली होती. यावेळी काँग्रेसमधील एक मोठा गट फुटल्याने काँग्रेसला महापौर पद गमवावे लागले होते. यावेळी सत्ताधारी काँग्रेसमधुन एक तृतीयांश नगरसेवकांनी दुसरा गट स्थापन केल्यानंतर हे सत्तातर झाल्याचे सांगितले जाते.

याच पार्श्‍वभूमीवर आता आ. सानप यांच्या समर्थक नगरसेवकांकडुन आता कायदेशिर सल्ला घेण्याचे काम सुरू झाल्याची चर्चा असुन नवीन कायद्यातील बाबींची पडताळणी केली जात आहे. सानप यांनी शहराध्यक्ष असतांना अनेकांना नगरसेवकाची उमेदवारी दिल्याने ते निवडुन आले आहे. यामुळे त्यांना नगरसेवकांकडुन मोठे समर्थन मिळेल अशी अपेक्षा आहे.

अशाप्रकारे, भाजपातील एक गट जर फुटून बाहेर पडला तर भाजपा अल्पमतात येऊन त्यांच्या हातून महापौर पद जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महापालिकेतील दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सानप समर्थकांचा गटाकडुन समर्थन दिल्यास महापालिकेतील राजकिय समिकरणे बदलण्याची शक्यता जाणकारांकडुन वर्तविली जात आहे.

महापालिका महापौरांना विधानसभेच्या निवडणुकीमुळे मुदतवाढ मिळाली आहे. ही मुदत संपल्यानंतर महापौर आरक्षण सोडत काढली जाऊन महापौर निवडणुक जाहीर होणार आहे. यापुर्वीच महापालिकेतील राजकिय समिकरणे बदलणार असल्याची चर्चा सध्या शहरात आहे.

खा. राऊत भेटीनंतर चर्चेला उधान
नाशिक पुर्व विधानसभा मतदार संघातील राकाँ. उमेदवार आ. बाळासाहेब सानप यांची शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी आकस्मीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत सानप यांना मिळालेल्या शुभेच्छातून काही संदेश बाहेर आले होते. तसेच तर्कवितर्क काढले गेले होते. खा. राऊत यांच्या भेटीने अनेक शक्यतेला जन्म दिला होता. यामुळेच येणार्‍या काळात सानप समर्थकांनी महापालिकेत शिवसेनेला पाठींबा दिला तर आश्‍चर्य वाटायला नको, अशी चर्चा बाहेर आली होती. यातून राजकारणात कोणीच कोणाचा दुश्मन नसतो, हेच स्ष्ट झाले आहे.

ना. रोड व नवीन नाशिकमध्ये पोटनिवडणुका
विधानसभा निवडणुकीसाठी देवळाली विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या नाशिकरोडच्या भाजपाच्या नगरसेविका सरोज अहिरे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत देवळालीतून उमेदवारी केली आहे. त्यांनी सेना आ. योगेश घोलप यांच्याशी तुल्यबळ लढत दिली आहे. अहिरे यांच्या राजीनाम्याने भाजपाचे एकने बळ कमी झाले असुन त्यांच्या रिक्त जागेवर लवकरच पोटनिवडणुक होणार आहे. तसेच नवीन नाशिक प्रभागातील शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यामुळे सेनेचे एकने बळ कमी झाले आहे. दातीर यांनी मनसेनेकडुन उमेदवारी करण्यासाठी पदाचा राजीनामा दिला असल्याने याठिकाणी लवकरच पोटनिवडणुक होणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!