Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

राष्ट्रीय मानांकनाच्या वरिष्ठ टेनिस स्पर्धा; निवेकच्या लॉनटेनिस मैदानावर चढाओढ सुरू

Share

सातपूर । प्रतिनिधी

निवेकच्या लॉन टेनिस मैदानावर पुन्हा एकदा राष्ट्रीय मानांकनासाठी चढाओढ सुरू झाली असून ग्लोबल इंडियन सीनियर टेनिस असोसिएशन (जिष्ठा) व निवेक यांच्या माध्यमातून या स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेचा शुभारंभ नुकताच पार पडला.

१६ ते २० नोव्हेंबरदरम्यान निवेक लॉन टेनिस मैदानावर ज्येष्ठांच्या या टेनिस स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. यात ३५ वर्षांच्या वरील, ४५ वर्षांवरील, ५५ वर्षांवरील व ६५ वर्षांवरील वयोगटांच्या वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत.

या स्पर्धांमध्ये ध्यानचंद पुरस्कार विजेता नितीन कीर्तने, ऑलिम्पिकमधील भूतपूर्व खेळाडू मर्विन फर्नांडिस, अजय कामत, यती गुजराती, रामराव आदींसह राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून राष्ट्रीय मानांकनही दिले जाणार आहे.

या स्पर्धेचा शुभारंभ निवेक अध्यक्ष संदीप गोयल, उपाध्यक्ष जनक सारडा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवेकचे रणजित सौद, पंकज खत्री, अशोक हेंबाडे, रमेश वैश्य, श्रीकांत कुमावत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!