Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

उद्योगांसाठी दक्षिण आफ्रिकेतील संधीची चाचपणी

Share

 

नाशिक । प्रतिनिधी

दक्षिण आफ्रिकेत व्यवसाय संधी उपलब्ध करून देणे व विस्तारासाठी संभाव्यता अधोरेखित करणे आणि नजिकच्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रात अतिशय प्रचंड वेगाने प्रगती करणार्‍या नाशिकमधील उद्योगांना दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने नाशिक इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशन (निटा) व दक्षिण आफ्रिकेच्या वाणिज्य दूतावासांसोबत चर्चा करण्यात आली.

हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत खा. हेमंत गोडसे, दक्षिण आफ्रिकेच्या वाणिज्य दूतावासच्या कान्सूलेट जनरल लेराटो मॅशिले, वाणिज्य दूतावास (आर्थिक) डीन हॉफ, व्यवसाय विकास सल्लागार राजन कुमार, माहिती सहाय्यक लालरिन झुआली तसेच भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रमुख प्रदीप पेशकार, निटाचे चेअरमन अरविंद महापात्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी हे होते.

या चर्चासत्रात नाशिकच्या सुमारे २० नामांकित आयटी उद्योगांंनी विकसित केलेले आपले तंत्रज्ञान दक्षिण आफ्रिकेच्या दूतावासातील अधिकार्‍यांसमोर सादर केले. उद्योगांच्या संशोधन व विकासातील तयारी बघून दक्षिण आफ्रिकेच्या अधिकार्‍यांनी समाधान व्यक्‍त केले. येथील कंपन्याना त्यांच्या व्यवसायाचा दक्षिण आफ्रिकेत विस्तार करण्यासंदर्भातील विविध मुद्यांवर त्यांनी प्रबोधन केले व शंकांचे निरसन केले खा. हेमंत गोडसे यांनी याप्रसंगी राज्य व केंद्र शासनातर्फे सर्वतोपरी सहाय्य देण्याचे सांगून आश्‍वस्त केले.

दक्षिण आफ्रिकेपाठोपाठच उत्तर अमेरिका व युरोप देशांच्या दूतावासांशी व्यवसाय विस्ताराबाबतच्या संधींवर चर्चा सुरू आहे. याबाबतही लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. या उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी आयटी उद्योगांनी निटाचे सदस्यत्व तातडीने घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी निटाचे उपाध्यक्ष ऋषिकेश वाकडकर, खजिनदार गिरीश पगारे, सचिव अमर ठाकरे, अभिषेक निकम, विशाल जाधव, नदीम शेख, विक्रम बोडके, शशांक वाघ, सुबोध महंत, सुधीर गोराडे आदी प्रयत्नशील होते.

आयटी उद्योग नेणार अटकेपार
स्थानिक उद्योजकांमध्ये कमालीची क्षमता असून, उद्योग येत नाही म्हणून न थांबता नाशिकच्या क्षमतांना जगात सिध्द करुन नवनवीन संधी निर्माण करण्याचा मानस आहे.
अरविंद महापात्रा (अध्यक्ष निटा )

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!