Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

शेतमाल विक्रीनंतर आता रोख रक्कम

Share

लासलगाव। वार्ताहर

केंद्र सरकारने १ सप्टेंबर पासून सर्व शेतमाल लिलावानंतर शेतकर्‍यांना रोख रक्कम न देता ती बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा सर्व स्तरातून विरोध होवू लागल्याने अखेर शासनाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने आता शेतमाल विक्रीनंतर शेतकर्‍यांना रोख रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासनाने शेतमाल विक्रीनंतर शेतमालाचे पैसे बँक खाती वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णया विरुद्ध लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी शासनाकडे पत्रव्यवहार करुन हा निर्णय स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यासाठी बाजार समितीने पालकमंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री निर्मला सितारामन, खासदार भारती पवार यांना निवेदन दिले होते.

दरम्यान काल अर्थमंत्री यांनी बँकेतून काढावयाच्या रकमेवर २ टक्के टी.डी.एस रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आता बाजार समितीत विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे रोखीने मिळणार आहे.

शेतकरी बांधवांना शेतीमाल विक्रीनंतर मिळणार्‍या रोख पैशांमधून त्यांच्या आर्थिक गरजा (उदा. ट्रॅक्टर, गाडी भाडे, पुढील हंगामातील मशागतीसाठी लागणारे बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते, इंधन, किराणा माल, शेतमजुरांची मजुरी इ. रकमा) भागविणेसाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात .

सदर अडचणींमुळे शेतकरी बांधवांमध्ये केंद्र शासनाच्या ध्येय धोरणांबाबत असंतोष निर्माण झाला असल्याने शेतकरी बांधवांची दैनंदीन आर्थिक निकड विचारात घेवून व्यापारी वर्गास शेतकरी बांधवांना अदा करावयाच्या शेतीमाल विक्रीची रक्कम रोख स्वरुपात अदा करणेसाठी बँकेतून काढावयाच्या रोख रकमेवरील २ टक्के उद्दम कर (टीडीएस) रद्द करणेबाबत बाजार समितीने केंद्र व राज्य शासनाकडे मागणी केली होती. त्यामुळे शेतमाल विक्री नतंर शेतकर्‍यांना विक्री केलेल्या मालाचे पैसे रोखीने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने आपला निर्णय मागे घेवून शेतमालाचे पैसे रोख मिळणार असल्याने शेतकरी बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!