Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवाढदिवसाचा खर्च टाळून घरोघरी होमिओपॅथी औषधाचे वाटप

वाढदिवसाचा खर्च टाळून घरोघरी होमिओपॅथी औषधाचे वाटप

गणेश बनकर यांचा अनोखा उपक्रम २५ हजार कुटूंबापर्यंत पोहचवणार औषध

निफाड । प्रतिनिधी

- Advertisement -

जगभरात करोना आजाराणे थैमान घातले असून संपूर्ण भारत देश ह्या आजाराशी लढा देत आहे प्रत्येक जण आपआपल्या परिने होईल त्या मार्गाने देशसेवा करताना दिसत आहे याच भावनेतून अल्पावधीतच आपल्या कार्यातून पिंपळगावकरांच्या मनामनात मोहर उमटविनाऱ्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, गणेश बनकर यांनी करोना पार्श्वभूमीवर  वाढदिवसाचा खर्च टाळून त्याऐवजी पिंपळगाव शहरासह परिसरातील नारायणटेबी .बेहड ,अंतरवेली ,मुखेड उबरखेड या गावातील घरोघरी माध्यमातून भारत आरोग्य मंत्रालय यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी सूचित केलेले होमिओपॅथी आर्सोनिक अल्बम 30 औषधांचे वाटप आपल्या स्वखर्चाने मोफत वाटप सुरू केल्याने पिंपळगावकरांसह गटातील नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी होमिओपॅथी औषधे खऱ्या अर्थाने लाभदायी ठरणार आहे.

यंदाचा वाढदिवस साजरा न करता त्याऐवजी पिंपळगाव बसवंत शहरासह पिंपळगाव गटातील गावामध्ये आपल्या स्वखर्चाने घरोघरी होमिओपॅथी औषधांचे वाटप दि.२२ पासून सुरू केले आहे. पिंपळगाव शहरासह संपूर्ण पिंपळगाव गटातील जवळपास २५ हजारांहून अधिक कुटुंबांना औषधे वितरित करण्याचा मानस आहे
गणेश बनकर सदस्य ग्रामपंचायत पिंपळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या