Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

जिल्ह्यात २४ हजार ५४७ मतदारांची वाढ; नाशिक पश्‍चिममध्ये सर्वाधिक नवमतदार

Share

नाशिक । प्रतिनिधी

निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदार यादीत नाव नोंदवण्याची मतदारांना मुदत दिली होती. या मुदतीत जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत २४ हजार ५४७ मतदारांची वाढ झाली आहे. त्यात सर्वाधिक २ हजार ९९५ मतदारांची नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात वाढ झाली आहे. जिल्ह्यात पूर्वी ४५ लाख ३३ हजार ६३९ मतदार होते. ही संख्या आता ४५ लाख ५८ हजार १८६ इतकी झाली आहे.

मतदानाचा टक्‍का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत मतदारांना नावनोंदणीची संधी उपलब्ध करून दिली होती. मतदार यादीत नाव नोंदवण्याची ज्यांची संधी हुकली अशा मतदारांना संधी देण्यात आली होती. ३१ ऑगस्टला जिल्ह्यातील १५ मतदारसंघांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत या यादीत तब्बल २४ हजार ५४७ नवमतदारांची वाढ झालीे.

यात नाशिक पश्‍चिममध्ये ३ हजार, नाशिक पूर्व मतदारसंघात १ हजार १९७ आणि मध्य नाशिकमध्ये १ हजार ९५५ नवमतदारांची नोंदणी झाली आहे. देवळालीतही ६३४ नव्याने मतदार नोंदवले आहेत.
शहरातील चार मतदारसंघांत मिळून ६ हजार ७८१ मतदारांची नव्याने नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील ११ विधानसभा मतदारसंघांत १७ हजार ७६६ नवमतदार वाढले आहेत. आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या संधीमुळे या नवमतदारांना २१ ऑगस्टला मतदानाचा हक्‍क बजावता येणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!