Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पवारांनी साधलेल्या ‘वेळे’ची चर्चा

Share

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात मुख्यमंत्रीपदाचा लोण्याचा गोळा कोण मटकवणार यासाठी भाजप – शिवसेनेत सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्याला भेट देत परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्याची पाहणी केली.

पवारांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जात त्यांचे अश्रू पुसले. ८० वर्षाच्या पवारांनी पायला भिंगरी लावत साधलेल्या या अचूक टायमिंगची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यापुढे मुख्यमंत्रीपदावरुन फुटत असलेले फटाके देखील फिके पडले आहे.

राजकारणात सध्या ‘पवार’ वेळ सुरु आहे. ‘मातोश्री’ व ‘वर्षा’पेक्षाही शरद पवार यांचे‘सिल्वर ओक’निवासस्थान जादा चर्चेत आहे. सत्ता स्थापनेच्या खेळात पवारांनी ‘प्यादे’ कामाला लावल्यांचे बोलले जाते. भाजप – शिवसेनेते ंमुख्यमंत्रीपदावरुन फटाके फुटत असताना पवारांनी मात्र, परतीच्या पावसाने झालेल्या नूकसानीचा आढावा घेण्यासाठी दौरे सुरु केले आहे.

पवारांच्या पडत्या काळात नाशिक जिल्ह्याने नेहमी त्यांना खंबीरपणे साथ दिली. यंदाच्या निवडणुकीत देखील जिल्ह्याने राष्ट्रवादीला सर्वात जादा सहा जागा दिल्या. ‘पवार बोले अन् जिल्हा चाले’ हे समीकरण पुन्हा एकदा पहायला मिळाले. पवारांनी देखील त्याची जाणीव ठेवत जिल्ह्यातील नूकसान ग्रस्त तालुक्यांना भेट देऊन पाहणी केली.

शुक्रवारी (दि.१) इगतपुरीपासून त्यांच्या दोन दिवसीय जिल्हा दौर्‍याला सुरुवात झाली. त्यांनी दिंडोरी, कळवण, बागलाण या तालुक्यांना भेटी दिल्या. या सर्व ठिकाणी पवारांचे शेतकर्‍यांनी जोरदार स्वागत केले. पवारांनी थेट शेतकर्‍यांचा बांध गाठत नूकसानीची पाहणी केली.आस्मानी संकटाने खचू न जाता त्याचा मुकाबला करा, असे सल्ला त्यांनी दिला.

एकीकडे भाजप व शिवसेना सत्तासंघर्षात मश्गूल असताना ८० वर्षाच्या तरुण पवारांनी पायाला पुन्हा एकदा भिंगरी लावल्याचे पहायला मिळाले. हा अचूक टायमिगं साधत पवारांनी पुन्हा एकदा भाजप व सेनेला धोबीपछाड दिल्याचे बोलले जात आहे. सत्तासंघर्षाच्या राजकारणात ‘जाणत्या राजा’ ने साधलेल्या या टायमिंगची जोरदार चर्चा राज्यभरात झडत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!