Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राष्ट्रीयकृत बँक कर्मचार्‍यांच्या संपामुळे सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक व्यवहार ठप्प

Share

नाशिक । प्रतिनिधी

२० टक्के वेतनवाढ मिळावी, या मागणीसाठी बँक सेेवक, अधिकारी संपावर गेले आहेत. संपाच्या दुसर्‍या दिवशी नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. शहरातील विविध भागातील एटीएममध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांना आता रोख रकमेची टंचाई भासू लागली आहे, तर विविध बँकांच्या कर्जदार ग्राहकांना सीडीएम फूल असल्याने हातात पैसे असूनही बँकेच्या खात्यावर पैसे जमा करता आले नाही,त्यामुळे अनेक ग्राहकांना त्याच्या कर्जाचा हप्ता भरण्यात अडचणी आल्याचे दिसून आले.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू)च्या नेतृत्वात देशव्यापी दोनदिवसीय संप पुकारला असून, या संपात नाशिक जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी व अधिकारी यांच्यासह एकूण नऊ संघटनांनी शुक्रवारी (दि.३१) व शनिवारी (दि.१) देशव्यापी संपात सहभाग घेतल्याने जिल्हाभरातील सुमारे साडेतीनशे शाखांमधील दीडशे ते पावणेदोनशे कोटींचे व्यवहार अडकून पडले आहेत, तर एटीएममध्ये दोन दिवसांपासून रोकड जमा झालेली नसल्याने पैसे काढण्यासाठी जाणार्‍या ग्राहकांची निराशा होत असून सीडीएम मशीनमधून पैसे काढले गेलेले नसल्याने हातात पैसे असतानाही ग्राहकांना आपल्या खात्यावर पैसे जमा करता येऊ शकत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या दोन दिवसांच्या संपानंतर सलग तिसर्‍या दिवशी रविवारच्या सुटीमुळे बँकांचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशी ठप्प होणार आहे . त्यामुळे सर्वसामान्य खातेदारांसह व्यापार उद्योग क्षेत्रालाही या संपाचा मोठा फटका बसला आहे. बँक कर्मचार्‍यांना १ नोव्हेंबर २०१७ पासून २० टक्के वेतनवाढ मिळावी, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, स्पेशल अलाउन्स बेसिक पेमध्ये एकत्रित करावा, बँक अधिकार्‍यांसाठी कामाची वेळ निश्चित असावी, फॅमिली पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, पेन्शन अपडेशन, दहा राष्ट्रीयीकृत बँकांचा चार बँकांमध्ये विलिनीकरणाचा निर्णय रद्द करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी बँक कर्मचारी व अधिकार्‍यांनी पुकारलेल्या या संपत जिल्ह्यातील जवळपास ३५० शाखांमधील सुमारे २५०० कर्मचारी सहभागी झाल्याने सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज १००टक्के ठप्प झाले आहे.

ऑनलाईनवर भिस्त
या संपामुळे बँकेचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले असून एटीएम व सीडीएममधूनही बँकेच्या खात्यावर कोणतेही व्यवहार होऊ शकत नसल्याने ग्राहकांची सर्व भिस्त आता ऑनलाईन व्यवहारांवर अवलंबून आहे. परंतु ऑनलाईन व्यावहार करण्यासाठी अनेक मर्यादा असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!