Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राष्ट्रीय मतदार दिन : निर्भयपणे मतदान हेच लोकशाहीचे बलस्थान

Share
राष्ट्रीय मतदार दिन : निर्भयपणे मतदान हेच लोकशाहीचे बलस्थान; National Voters' Day: Voting freely is the strength of democracy

नाशिक । प्रतिनिधी

बलशाली लोकशाहीसाठी निवडणूक सारक्षरता या विषयावर आधारित यंदा मतदार नोंदणी आणि जागृती करण्यात आली.निर्भयपणे मतदान प्रक्रियेंतर्गतच बलशाली लोकशाहीची निर्मिती करता येईल. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली येऊन मतदान न करता निर्भयपणे मतदान करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी. यासाठी राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूवर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच अधिकार्‍यांनी बळकट लोकशाहीसाठीची शपथ घेतली.

२५ जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शुक्रवारी ( दि. २४) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उपस्थित कर्मचारी अधिकार्‍यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली. या निमित्ताने लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचा उपक्रम साजरा करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले होते. त्याअंतर्गत बलशाही लोकशाही करिता निवडणूक साक्षरता हा विषय २०२० या वर्षाकरिता निवडण्यात आला असून जास्तीत जास्त मतदारांचा लोकशाही बळकटीकरण यामध्ये समावेश असावा. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले.

वविध उपक्रमाद्वारे साजरा 
नव मतदारांना ‘मतदार असल्याचा अभिमान आणि मतदानासाठी सज्ज’ असे घोषवाक्य लिहिलेले बिल्ल्यांचे वाटप करण्यात आले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करत प्रोत्साहन दिले जाणार आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, परिसंवाद अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यातील उत्कृष्ठ पहिल्या तीन विजेत्यांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय दिव्यांग मतदार, नव मतदारांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!