Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विद्यार्थ्यांची कागदपत्रे होणार संरक्षित; ‘नॅड’वर नोंदणी करण्याच्या सूचना

Share

नाशिक । प्रतिनिधी

विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल अ‍ॅकॅडमिक डिपॉझिटरी(नॅड) ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. सुरू केलेल्या नॅडला विद्यापीठांचा वाढता प्रतिसाद पाहून, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांकडे असलेली नवी आणि जुनी माहिती ३१ डिसेंबरपर्यंत देण्यास सांगितले आहे.

त्याची अंमलबजावणी यूजीसीच्या माध्यमातून केली जात आहे. त्यासाठी देशभरातील इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स, केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठांसह सेवा स्तर करार (सर्व्हिस लेव्हल अ‍ॅग्रीमेंट) करण्यात आला.आतापर्यंत १ हजार १०६ संस्थांनी हा करार केला असल्याचे ‘यूजीसी’ने स्पष्ट केले आहे.

‘नॅड’चा प्रतिसाद वाढवण्यासाठी विद्यापीठांमध्ये नॅड कक्ष सुरू करावा, त्यासाठी समन्वय अधिकार्‍यांची नेमणूक करावी, प्रवेश आणि परीक्षा अर्जांमध्ये नॅड ओळखपत्रासाठी स्वतंत्र जागा असावी, नॅड ओळखपत्रासाठी विद्यार्थ्यांचे ई-मेल आणि मोबाइल क्रमांक घ्यावेत. विद्यार्थ्यांना ‘नॅड’च्या वेबसाइटवर नोंदणी करण्यासाठी सांगावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!