Friday, April 26, 2024
Homeनाशिकदुर्मिळ नाणी, प्राचीन दस्तऐवजांचा खजिना ; ‘रेअर फेअर २०२०’ प्रदर्शनाला नाशिककरांचा प्रतिसाद

दुर्मिळ नाणी, प्राचीन दस्तऐवजांचा खजिना ; ‘रेअर फेअर २०२०’ प्रदर्शनाला नाशिककरांचा प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी

वेगवेगळ्या कालखंडातील दुर्मिळ व मौल्यवान नाणी, तिसर्‍या शतकापासूनची विविध राजसत्ताकालीन पोस्टाचे तिकीट, ढाली, तलवारी, तोफा, मूर्ती, चलनी नोटा, शिक्के यांसह प्राचीन दस्ताऐवजी पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. निमित्त होंते कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिसमॅटिक अ‍ॅण्ड रेअर आयटेम्स संस्थेतर्फे आयोजित तीन दिवसीय ‘रेअर फेअर २०२०’ या प्रदर्शनाचे.

- Advertisement -

गंगापूर रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल येथे शुक्रवारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पगार, उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेश जुन्नरे, डॉ. दिलीप बलसेकर, शंकर साठे आणि किशोर चांडक उपस्थित होते.

वेगवेगळ्या कालखंडातील प्राचीन नाणी, शस्त्रे, आणि ग्रंथ संपदेतून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवन आणि संस्कृतीची माहिती मिळते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिककरांना हजारो वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास करता येणार आहे. नवीन पिढीमध्ये इतिहास विषयाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने हा अतिशय स्तुत्य आणि आगळावेगळा उपक्रम असल्याचे यावेळी नांगरे पाटील म्हणाले.

या प्रदर्शनाचे यदा सहावे वर्षे आहे. प्रर्दशनातील पेशवाई, शिवकालीन शिवराई, सुवर्ण होन, नाण्यांचा प्रवास दर्शवणार्‍या डायर्‍या या देखील आकर्षनाचे केंद्रबिंदू ठरत आहे. या प्रदर्शनात शहरातील १५ संग्राहक आणि संस्थेचे सभासद तसेच देशभरातील ३० हून अधिक नामांकित संग्राहक त्यांच्या सोने, चांदीच्या सुमारे हजारो वर्षांपासून ते आता पर्यंतचे नाणी, चलनी नोटा, दुर्मिळ वस्तू मांडल्या आहेत.

प्रदर्शनात देशातील सुमारे ४० हून अधिक व्यापार्‍यांनी खरेदी-विक्रीचे स्टॉल्स उभारले आहे. शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ४ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ८ या दरम्यान भारतातील नामांकित ऑक्शन्स कंपन्यांच्या अ‍ॅन्टिक कॉइन्स, चलनी नोटा यांचे ऑक्शन झाले. यातून नाशिककर तसेच इतर संग्राहकांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या आवडीच्या वस्तू, नाणी यांची खरेदी केली. प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे. प्रदर्शन रविवार दि.१२ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ८ यावेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.

दोनशे देशातील नाणी, नोटांचा खजिना
प्रदर्शनात सहभागी झालेल्या नामांकित संग्रहकांकडे तांबे, सोने, चांदी, पितळ आदी धातूंंच्या विविध कालखंडातील दुर्मिळ नाणी आहेत. काही संग्राहकांकडे तब्बल दोनशे देशांतील नाणी व नोटांचा समावेश असून ती पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. याशिवाय स्मरणार्थ नाणी, ताम्रपत्रदेखील अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत

.

- Advertisment -

ताज्या बातम्या