Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

महिलांसाठीच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवाव्यात; ‘ती महिला’ संमेलनात ज्योती ठाकरे यांचे प्रतिपादन

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

शासनाने महिला सबलीकरणासाठी धोरणात्मक निर्णय घेतलेले आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध योजना अमलात आणल्या असून शिवसेनेच्या महिला आघाडीने महिलांच्या प्रभावी योजना प्रत्येक गरजू महिलेपर्यंत पोहोचवाव्या. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी खंबीर उभे रहावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ना. ज्योती ठाकरे यांनी केले.

शिवसेनेच्या वतीने शिंदे गाव येथे महिलांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रथम ‘ती महिला’ संमेलन तुळजाभवानी लॉन्स टोल नाक्याजवळ उत्साहात संपन्न झाले. यावेळी ठाकरे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, शिवसेनेच्या माध्यमातून शेतकरी व महिलांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. प्रत्येक मतदारसंघात शिवसेना आमदाराने विकास कामांद्वारे मतदार संघाला न्याय दिला आहे.

महिलांनी शिक्षण घेणे काळाची गरज असून आपल्या स्वास्थ्याची काळजी करणे तितकेच गरजेचे आहे. प्रत्येक स्त्री बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी झाली आहे. यावेळी शितल देवरुकर, कविता गावंड, आशा विचारे यांनी, महिला आज प्रत्येक क्षेत्रात काम करत असून त्या सक्षम झाल्या आहेत. बचतगटांच्या माध्यमातून त्या समाजात ताठ मानेने वावरत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास जि.प. अध्यक्षा शितल सांगळे, महिला आघाडी प्रमुख सत्यभामा गाडेकर, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, जयश्री खर्जुल, सुनिता कोठुळे, केशव पोरजे, रंजना बोराडे, आशा गोडसे, नयना घोलप, प्रतिभा कातोरे, तनुजा भोईर, भारती ताजनपुरे, सचिन मराठे, महेश बडवे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!