Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

शिवसेना नगरसेवकांचा सभात्याग ; भाजपा प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

आचारसंहिता लागण्यापूर्वी कामांच्या विषयाला मंजुरी मिळावी, यासाठी काल प्रभाग बैठक आयोजीत करण्यात आली होती. मात्र भाजपा पदाधिकार्‍यांकडून शिवसेना नगरसेवकांच्या कामांची अधिकार्‍यांमार्फत अडवणूक होत असल्याचा आरोप करत नगरसेवक प्रशांत दिवे यांनी निषेध करुन सभात्याग केला. त्यांच्या पाठोपाठ सत्यभामा गाडेकर, सुर्यंकांत लवटे, ज्योती खोले, सुनिता कोठुळे, रंजना बोराडे, सुुनिल गोडसे हेसुद्धा सभात्याग करत बैठकीतून निघून गेले.

विभागीय कार्यालयात सभापती विशाल संगमनेरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकरोड विभागाची बैठक झाली. प्रारंभी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी बिटको रुग्णालयात फिजीशियन नसून रुग्णांची हेळसांड होत असल्यावरुन वैद्यकिय अधिकार्‍यांना धारेवर धरले.

प्रशांत दिवे यांनीही गरोदर महिलांच्या तपासणीसाठी बिटको रुग्णालयात किटच नसल्याने सर्वसामान्य व गरिब महिलांना खासगी रुग्णालयात अधिक खर्चामध्ये तपासणी करावी लागते. तसेच शौचालय देखील नसल्याने रुग्णांच्या नातलगांची गैरसोय होत असल्याचे सांगितले.

त्यामुळे सभापतींनीही वैद्यकिय अधिकार्‍यांना त्वरीत सुधारणा करण्याचे आदेश दिले. यावेळी यावेळी नगरसेवक जयश्री खोले, सत्यभामा गाडेकर, रंजना बोराडे, सूर्यकांत लवटे, सुनील गोडसे, प्रशांत दिवे, अशासकीय सदस्य शंकर साडे, कांता वराडे हे उपस्थित होते.

शिवसेना नगरसेवकांची कामे होऊ द्यायची नाही म्हणून सत्ताधारी नगरसेवक खोटे आंदोलन करतात. मागील प्रभाग बैठकीमध्ये नगरसेवक बाजीराव भागवत यांनी खोटे आंदोलन करून एलइडीच्या विषयाला बगल दिल्याचा आरोप नगरसेवक प्रशांत दिवे यांनी प्रभाग बैठकीत केला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!