Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

दळणवळण क्षेत्रात चालकांची भूमिका अत्यंत महत्वाची – विनय आहिरे

Share

नाशिक | प्रतिनिधी  

देशाच्या संरक्षणासाठी ज्याप्रमाणे सैनिक आपली जबाबदारी पार पाडत असतात त्याचप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने दळणवळण क्षेत्रात चालकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे यांनी केले. ते आज नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आडगाव ट्रक टर्मिनल येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलतांना विनय आहिरे म्हणाले की,  दळणवळण क्षेत्रात चालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. देशाची अर्थव्यवस्थेतील ते एक महत्वाचा भाग आहे. मात्र सद्या चालकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने हा वाहतूक क्षेत्रासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे चालकांची संख्या अधिक वाढण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. शासन स्तरावर चालकांना आवश्यक मदत केली जाईल मात्र त्यामध्ये समाजाचा वाटा असणे देखील आवश्यक असून रात्र दिवस मेहनत करणाऱ्या चालकांना सन्मानाने वागणूक मिळावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव म्हणाले की, चालकांना येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी निमा कडून विशेष प्रयत्न केले जातील. त्यासाठी चालकांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात चालकांना येणाऱ्या विविध अडीअडचणी समजून त्या मार्गी लावल्या जावून चालकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संतोष मंडलेचा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड यांनी आपले मनोगत व्यक्त करत. संस्था करत असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. तसेच एसबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांकडून चालकांना बॅरीयर मुक्त भारत याविषयी मार्गदर्शन केले.

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चालक दिनाचे औचित्य साधून आडगाव ट्रक टर्मिनल येथे चालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी करून त्यांना तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. यासाठी मॅग्मा, अपोलो हॉस्पिटल, श्रीराम हॉस्पिटल या वैद्यकीय संस्थांतील तज्ञ डॉक्टरांकडून चालकांची तपासणी करण्यात आली. तसेच या कार्यक्रमासाठी कोटक महेंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय बँकेचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वायफळ, महेंद्र लॉजिस्टिकचे व्यवस्थापक नीरज भामरे, निमा आणि महाराष्ट्र चेंबर्सचे मिलिंद राजपूत, रोटरीचे माजी अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, सेक्रेटरी सुभाष जांगडा, शंकर धनवटे, सल्लागार सुनील बुरड, दादा देशमुख, महेंद्रसिंग राजपूत, दीपक ढिकले, विशाल पाठक, किशन बेनिवाल, अमोल शळके, कैलास शिंदे, आनंद राजपूत, नाना पाटील, मनोज उदावंत, बापू ताकाटे, सदाशिव पवार,अशोक मेमाणे यांच्यासह ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सदस्य, डॉक्टर तसेच वित्तीय संस्थांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!