Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

गांधीनगरला साकारतेय ६० फुटी रावणाची प्रतिकृती; ऐतिहासिक रामलीलाच्या दसरा महोत्सव कामाला गती

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

गांधीनगर येथील रामलीला मैदानावर तब्बल ६० फुटी रावणाची प्रतिकृती तयार करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. गांधीनगर रामलीला समितीने यंदा ६४ व्या वर्षात पदार्पण केले असून दरवर्षी रावण दहन हा कार्यक्रम संपूर्ण नाशिकरोड पंचक्रोशीत अविस्मरणीय ठरतो.

रावणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी समितीचे सर्वधर्मीय कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेतात. यावेळी ६० फुटी रावण तयार करण्यासाठी सुतळी, काथ्या, ओला व सुका बांबू, खिळे, कामट्या, घोटीव कागद, कपडा यांचा वापर करण्यात येऊन क्रेनच्या साहाय्याने उभा केला जातो. यावेळी फटाक्यांची आकर्षक आतषबाजी तसेच मैदानावर श्रीरामाची वानरसेना व रावणाची राक्षससेना यांच्यातील युद्धाचा प्रसंगी सादर केला जातो.

येत्या मंगळवारी (दि. ८) होणार्‍या दसरा महोत्सवाची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली असून हा नेत्रदीपक सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी हजारो रामभक्त उपस्थित असतात. नाशिकरोड पंचक्रोशीतील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहन केले जाते.

गांधीनगर गृहरक्षक दल कार्यालया समोर समितीचे महासचिव कपिल शर्मा, हरीष परदेशी, संजय लोळगे, प्रदीप भुजबळ, मनोहर बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते रमाकांत वाघमारे, सुनील मोदीयानी, तस्लिम पठाण, सुनील साधवांनी, साहिल शर्मा, सुमित पवार, सोनू पुरी, साहेबा सूर्यवंशी आदी कलावंत मेहनत घेत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!