Type to search

Featured नाशिक

अवैध मद्यविक्री; ५८ हजाराचा साठा जप्त

Share
नाशिकरोड |प्रतिनिधी 
येथील चेहेडी पंपिंग परिसरातील म्हसोबा नगरमध्ये नाशिकरोड पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने एका घरावर छापा टाकून सुमारे ५७ हजार ६०० रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली तर दुसरा फरार झाला आहे.
चेहेडी पंपिंग परिसरात म्हसोबानगर येथे अवैध मद्यविक्री होत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे विशाल कुंवर, भालेराव, वाजे यांना मिळाली असता त्यांनी पाळत ठेवून छापा टाकला असता कृष्णा पाचोरे हा युवक रंगेहाथ अवैध मद्यविक्री करत असताना निदर्शनास आले.
पोलिसांना बघताच पाचोरे फरार झाला तर रवींद्र रघुनाथ पगाळे याला ताब्यात घेण्यात आले. घराची झडती घेतली असता मॅकडॉल कंपनीच्या ३८४ बाटल्या (एकूण किंमत ५७ हजार ६००) जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी पोलीसांनी पगाळे व पाचोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून फरार पाचोरे याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!