मोबाईल चोरट्यास शिताफीने अटक

0

नाशिकरोड | प्रतिनिधी  येथील दत्तमंदिर चौकात गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्याने मोबाईल दुकानाच्या मजल्यावरील खिडकीचे गज तोडून सुमारे चार लाखाचे मोबाईल चोरले होते. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी सापळा रचून एका चोरट्यास शिताफीने अटक केली असून त्याच्याकडून ४ लाख ९ हजार रुपये किमतीचे महागड्या कंपनीचे २८ मोबाईल जप्त केले.

चोरट्याला न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गेल्या आठवड्यात बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्यानंतर सकाळी दुकानाचा सेवक शटर उघडून आत गेला तेव्हा हा प्रकार लक्षात आला.

त्यानंतर दुकान मालक सौरभ जानराव यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेबाबत उपनगर पोलिसांनी आठ दिवसांत छडा लावला असून सीसीटीव्हीच्या आधारे वपोनि प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउनि गणेश जाधव, कॉन्स्टेबल प्रदीप ठाकूर यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांचे सहकारी सतीश जगदाळे, सुनील कोकाटे, काशिनाथ गोडसे, अनिल शिंदे, किरण देशमुख, विलास गिते, समीर चंद्रमोरे, भावले, महेंद्र जाधव, अमोल टिळेकर यांनी संशयित शुभम रवी नकवाल यास सापळा रचून अटक केली.

त्याचे विचारपूस केली असता त्याने दत्तमंदिर चौकातील दुकानातून ४ लाख ९ हजारांचे २८ मोबाईल चोरल्याचे कबुली दिली. यात नोकीया, सॅमसंग, लावा, ओपो आदी कंपन्यांच्या मोबाईचा समावेश आहे. हे सर्व मोबाईल पोलिसांनी जप्त केले. याबाबत पुढील तपास वपोनि रायते यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश जाधव हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*