रेल्वे स्थानक परिसरातून बालिकेचे अपहरण

0
नाशिकरोड | प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून आलेल्या एका कुटुंबातील चार वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सरीता नातीक चव्हाण (३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आपण पतीसह दोन मुले व मुलगी मनमाड येथून वणीला मोलमजुरीच्या कामासाठी रेल्वेने जात असताना नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उतरलो.
प्लॅटफॉर्म क्र. ४ च्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर आम्ही जेवण करता असताना आमची चार वर्षांची मुलगी शौचास जाते असे सांगून गेली. मात्र, ती परत आलीच नाही. त्यानंतर आम्ही तिचा रेल्वे स्टेशन परिसरात सर्वत्र शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु, ती कुठेही आढळून आली नाही.
त्यामुळे तिचे कोणीतरी अपहरण केले असावे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुलीचे वर्णन रंगाने गोरी, उंची अडीच फूट, केस काळे, चेहरा गोलाकार, अंगात निळ्या रंगाचा व काळ्या ठिपक्यांचा फ्रॉक असे आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

*