Type to search

Featured नाशिक

आषाढी एकादशी निमित्त आनंदनगरला ‘विठ्ठल निवांत जाहला’ कार्यक्रम

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी 

आषाढी एकादशी निमित्त आनंदनगर येथील ईगल स्पोर्टस् क्लबच्या दालनात भगवान विठ्ठलाच्या जीवनावरील व वारकरी विषयाचे वास्तव ‘विठ्ठल निवांत जाहला’ हा कार्यक्रम झाला.

युवा कॅलिग्राफर सचिन गडाख व महेंद्र जगताप यांच्या संकल्पनेतून विठ्ठल व वारकरी विषयावर विविध प्रकारच्या कलाकृती सादर करण्यात आल्या. त्यात आर्टीस्ट रुद्र मजेठिया, रश्मी विसपुते, प्रियंका कोदे यांनीही आपली कला सादर केली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सलोनी बागडी, आराधना गोसावी, अथर्व गडाख, इराफन शेख, गणेश गायखे, अशोक पगार, अक्षय शेळके आदींनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!