Type to search

गरजूंसाठी मोफत वाहनाची सोय

Featured नाशिक

गरजूंसाठी मोफत वाहनाची सोय

Share
नाशिकरोड | प्रतिनिधी
येथील धोंगडेनगर प्रणित शिवशाही युवा फाऊन्डेशनतर्फे सतिश बिर्‍हाडे व पवन उगले यांच्या स्मरणार्थ रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहन लोकार्पण सोहळा होणार आहे. ज्येष्ठांना दवाखाना व अन्य महत्वाच्या कामांना जाण्याकरीता तसेच गर्भवती महिला व अन्य गरजूंना हे वाहन मोफत उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती अतुल धोंगडे यांनी दिली.
दि. २१ रोजी सायंकाळी साडेसात वाजता दत्त मंदिररोडवरील लायन्स क्लब येथे हा लोकार्पण सोहळा होणार असून या उपक्रमासाठी योगीराज गजानन ज्येष्ठ नागरिक संघाचे सहकार्य लाभले आहे. प्रा. यशवंत पाटील, म्हसोबा पंच कमिटीचे अध्यक्ष अ‍‍ॅड. शांतारामबापू कदम यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
प्रमुख पाहुणे माजी महापौर अशोक मुतर्डक, प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक रमेश धोंगडे, संगीता गायकवाड, सूर्यकांत लवटे, ज्योती खोले, वसंतराव नगरकर, राहुल ढिकले, शिरीष लवटे, बंटी कोरडे, दिनकर पाळदे, रमेश जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. संयोजन सचिन पाटील, शाम धोंगडे, मोहन धोंगडे, शिवा धोंगडे, अमन रोकडे, रितेश चव्हाण, हर्षद जोशी आदी संयोजन करत आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!