Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक – पुणे ग्रीन कॉरिडोर; युवकाच्या यकृताचे पुण्यातील रूग्णास प्रत्यारोपण

नाशिक – पुणे ग्रीन कॉरिडोर; युवकाच्या यकृताचे पुण्यातील रूग्णास प्रत्यारोपण

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक येथूने पुणे येथे विशेष ‘ग्रीन कॉरिडोर’च्या माध्यमातून अवघ्या अडीच तासात यकृत पाठवण्यात आले. ते पुण्यातील रूग्णास प्रत्यारोपीत करण्यात येऊन त्यास जीवदान देण्यात यश आले. आदिवासी भागातील व्यक्तींनी अवदावदानाची ही पहिलीच घटना असून, तब्बल अडीच तासांत हे यकृत नाशिकवरुन पुण्यात पोहोचले.

- Advertisement -

भावशा सोनू महाले (३१, रा.दह्याने दिगर, ता.कळवण) असे यकृत दान करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत सोमवारी (दि.२३) रोजी काम संपल्यानंतर रात्री घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला पाठिमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, अपघातात त्यांचा मेंदूमृत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे अशक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. त्यामुळे मंगळवारी (दि.२४) सायंकाळी भावशा यांना गंगापूर रोडवरील ऋषिकेश हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येताच डॉक्टरांनी भावशा महाले यांचे वडील (सोनू) व भाऊ (शिवाजी) यांच्याशी चर्चा करत अवयवदान करण्याची विनंती केली.

नातेवाईकांनी अवयवदान करण्यास परवानगी दिल्यानंतर पुणे येथील ज्यूपिटर हॉस्पीटलला स्वादूपिंड व मूत्रपिंड, रुबी हॉल हॉस्पीटलसाठी यकृत देण्याचा निर्णय झाला. पुण्याहून खास डॉक्टरांची टीक नाशिकमध्ये दाखल झाली. सकाळी ११ वाजता या सर्व घडामोडी झाल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांची परवानगी मिळवत ग्रीन कॉरीडोर करण्यात आला. सायंकाळी ६ वाजेला रुग्णवाहिका ऋषिकेश हॉस्पीटलजवळून निघाली. वाहतूक पोलीसांच्या दोन गाड्यांचा ताफा या रुग्णवाहिकेसोबत देण्यात आला. गंगापूर रोडवरुन कॅनडा कॉर्नरमार्गे मायको सर्कल, मुंबई नाका व द्वारका मार्गे पुण्याच्या दिशेने रवाना झाली.

प्रेरणादाई निर्णय
सामन्य नागरीक तयार होत नसताना आदिवासी भागातील व्यक्तिंनी अवयवदान करणेअयवदान करण्याची ही पहिलीच घटना आहे. अवयवय दानाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता असून, मेंदूमृत झालेल्या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय महाले कुटुंबियांनी घेतला. ही समाजासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे.
-डॉ.भाऊसाहेब मोरे, संचालक (ऋषिकेश हॉस्पीटल)

- Advertisment -

ताज्या बातम्या