Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक महानगरपालिका : अटलगौरव क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन

Share
नाशिक महानगरपालिका : अटलगौरव क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन; Nashik Municipal Corporation: Inauguration of Atalgaurav Sports Competition and Cultural Festival

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग तर्फे अटलगौरव क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे शहर पातळीचे उदघाटन  महापौर सतीश नाना कुलकर्णी ,शिक्षण समितीच्या सभापती संगीता गायकवाड ,उपसभापती शाहीन मिर्झा ,शिक्षण समिती सदस्य जगदिश पवार ,मनसे गटनेत्या नंदिनीताई बोडके,नगरसेवक रुची कुंभारकर,नगरसेविका छायाताई देवांग,नगरसेवक सुरेश खेताडे,शिक्षणाधिकारी देवीदास महाजन ,सामाजिक कार्यकर्ते सलिम मिर्जा बेग ,संध्याताई कुलकर्णी यांचे हस्ते क्रिडाज्योत प्रज्वलित करुन करण्यात आले.

प्रसंगी खेळाडूनी संचलन पथकातून मानवंदना मान्यवरांंना दिली. मान्यवरांचे हस्ते फुगे हवेत सोडून उदघाटन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी महापौर सतिश नाना कुलकर्णी यानी उपस्थित खेळाडुंचे कौतुक करुन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यातून पूढे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असे गौरवउदगार काढले.

शिक्षण समिती सभापती संगिता गायकवाड यांनी सहभागी खेळाडू याना शुभेच्छा दिल्या. यापुढे शिक्षण समितीच्या मार्फत गुणवत्तावाढी व दर्जेदार शिक्षणासाठी  विविध उपक्रम राबविले जातील असे सांगितलें.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन ,सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले,आभार राजेश दाभाडे यानी मानले कार्यक्रमासाठी सर्व केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक,शिक्षक संघटना पदाधिकारी ,शिक्षक ,कामाठी  यानी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!