Friday, May 10, 2024
Homeनाशिकनाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग २६ मधील पोट निवडणूकीसाठी ३४ टक्के मतदान

नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग २६ मधील पोट निवडणूकीसाठी ३४ टक्के मतदान

सातपूर । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग २६ मधील पोट निवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेकडे मतदारांनी पाठ फिरवली असून, दिवसभरात केवळ ३४ टक्के मतदान झाले.

- Advertisement -

सातपूर विभागातील प्रभाग २६ च्या पोटनिवडणूकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात ३२ हजार ६०० मतदारांपैकी ११ हजार ०६५ मतदारांनी म्हणजेच ३३.६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ५ टक्के मतदान झाले होते.तर ११ वाजेपर्यंत हा आकडा ११ टक्कांवर पोहोचला होता. दुपारच्या प्रहरात हीच गती कायम राहीलेली होती. दीड वाजेपर्यंत १७ टक्के तर साडेतीन वाजेपर्यंत एकूण २५.३३ टक्के मतदान झाल्याची नोंद होती. सायंकाळी ५.३० ला मतदान संपल्यांपर्यंत ३३.६५ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले.

सुदैवाने मतदान कक्षांत कोठेही मतदान यंत्रात बिघाड झाल्याची एकही तक्रार आली नाही. मतदान केंद्राबाहेर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत होती त्यामुळे निवडणूकीचा माहोल तयार झालेला असला तरी मतदारांनी मात्र या निवडणूकीबाबत निरुत्साह दाखवल्याने मतदान केंद्रात शुकशुकाट दिसून आला होता.

या अत्यल्प मतदानाचा लाभ कोणाला होईल? याच विचाराने उमेदवारांंनी देव पाण्यात ठेवलेले आहेत. चार प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत असल्याने मतदानात झालेल्या ११ हजार ०६५ मतांपैकी बहुमत घेत कोण बाजी मारणार हे व्यक्त करणे कंठीण झालेले आहेत.

उद्या  मतमोजणी
उद्या  शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून सातपूर क्लब हाऊस येथे मतमोजणीला प्रारंभ करण्यात येणार आहे. सात टेबलद्वारे ६ फेर्‍यांतून ही मोजणी केली जाणार आहे. मतांची गोळा बेरीज केल्यानंतर निवडणूकीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक अधिकारी डॉ.अरविंद आतूर्लीकर यांंनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या