Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिक जिमखाना क्रीडा महोत्सवाचा समारोप

नाशिक जिमखाना क्रीडा महोत्सवाचा समारोप

जिल्हाधिकारी मांढरे यांच्या हस्ते बक्षिस वितरण

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

नासिक जिमखाना आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण समारंभ नासिक जिमखाना येथे पार पडला. जिल्हाधिकारी सुरज मांढरे व उपस्थितांच्या हस्ते विजयी खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात आले.  या प्रसंगी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी संस्थेत उपलब्ध असलेल्या विविध खेळांच्या सुविधांची व संकुलांची पाहणी केली. २०१९ मध्ये राज्य राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त व भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या संस्थेच्या खेळाडूंना यावेळी सुरज मांढरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला

त्यामध्ये तनिशा कोटेचा (टेबल टेनिस) अमेय खोंड (बॅडमिंटन) सायली वाणी (टेबल टेनिस) सौमित देशपांडे( टेबल टेनिस) व कुशल चोपडा(टेबल टेनिस) यांचा समावेश होता. याप्रसंगी जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. व्ही. एच. पाटील व राज्य बॅडमिंटन संघटनेचे पधाधिकारी एस. राजन यांचाही सन्मान संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेतील खेळाडूंना आणि स्पर्धा आयोजन करण्यासाठी सहकार्य करणार्‍या आयोजकांचा याप्रसंगी प्रमुख पाहुणांच्या व संस्थेच्या पदाधिकारी यांच्या शुभहस्ते चषक व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मांढरे म्हणाले, नाशिक जिल्हा हा पर्यावरणाच्या दृष्टिने योग्य व इतर बाबतीत समृद्ध जिल्हा असून येथील वातावरण व हवामान खेळासाठी अत्यंत पोषक आहे. यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना खेळासाठी प्रोत्साहन देऊन असलेल्या अद्ययावत सुविधांचा वापर केल्यास आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होऊ शकतात असे मत व्यक्त केले. तसेच क्रीडा क्षेत्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रस्ताविक संस्थेचे चिटणीस राधेश्याम मुंदडा यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव शेखर भंडारी यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर नितीन चौधरी प्रकाश सिकची, मिलिंद जोशी, झुलकर जहागीरदार, अभिषेक छाजेड, राजेश भरवीरकर, मोहन सदावर्ते, अलीअसगर आदमजी, नारायण जाधव, मंगेश गंभीरे, चंदन जाधव, जयंत कर्पे आदी मान्यवर पालक खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल असा

लाँन टेनिस

१२ वर्ष मुली ः अनन्या यादव, शोना राठी
१२ वर्ष मुले ः द्विज पाटील, शिवराज भोसले
१४ वर्ष मुली ः धनश्री पाटील, शोना राठी
१४ वर्ष मुले ः लक्ष गुजराथी, अव्दैत भातखंडे
१८ वर्ष मुले ः लक्ष गुजराथी, अव्दैत भातखंडे

टेबल टेनिस
जुनिअर बॉईज ः कुशल चोपडा, अन्वय पवार
जुनिअर गर्ल्स ः तनिषा कोटेचा, सायली वाणी
ओपन सिंगल्स ः पुनीत देसाई, कुशल चोपडा
ओपन डबल्स ः अजिंक्य शिंत्रे व पुनीत देसाई – दिवेंदू चांदुरकर व डॉ. अमोल सरोदे

वेटरन्स सिंगल मेन्स ३९ : दिवेंदू चांदुरकर, पिनाक शालीग्राम
वेटरन्स सिंगल मेन्स ४९ :  राजेश भरवीरकर, शिवानंद कुंडाजे

बुद्धिबळ

१० वर्ष ः प्रथम – तनिष्क महाले, द्वितीय – सार्थक भापकर, तृतीय – ऋतुराज पांचाल, चर्तुर्थ – प्रणव भुजबळ , पंचम – ईश्वर रोकडे , १६ वर्ष ः प्रथम – सृष्टि रांका, द्वितीय – सार्थक भापकर , तृतीय – देवांश मौर्या, चर्तुर्थ – सिया कुलकर्णी , पंचम – संम्यक लोखंडे, महिला गट ः धनश्री राठी, समीक्षा भापकर, खुला गट ः प्रथम – धनश्री राठी, द्वितीय – संम्यक लोखंडे, तृतीय – जयदेव जव्हेरी, चर्तुर्थ – सृष्टी रांका, पंचम – वरून वाघ

बॅडमिंटन
१४ वर्ष मुले ः प्रज्वल सोनावणे, पार्थ लोहकरे
१५ वर्ष मुली ः रिद्धी कदोई, क्रिष्णा काकडे
१७ वर्ष मुले ः प्रज्वल सोनावणे, शुभम अहिरे
१७ वर्ष मुली ः देवांगी जाधव, प्रांजल अंधारे
१९ वर्ष मुले ः राजदिप मानकर, विपुल चाफेकर

ओपन सिंगल ः मनोज महाजन, विनायक दंडवते
ओपन डबल्स ः विनायक दंडवते व अजिंक्य पाथरकर – अमित देशपांडे व अमेय खोंड
महिला डबल्स ः रिद्धी कांदोई व वरदा एकांडे – देवांगी जाधव व मैत्री सोनावणे
ओपन मिक्स डबल्स ः विक्रांत करंजकर व विशाखा पवार – रिद्धी कांदोई व सिद्धार्थ वाघ

वेटरन्स डबल्स ३५ ः अमित देशपांडे व भ्रमर -पराग एकांडे व अश्विन सोनावणे
वेटरन्स डबल्स ८५ ः विक्रांत करंजकर व पराग एकांडे – चंदन जाधव व भ्रमर

- Advertisment -

ताज्या बातम्या