Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे इनोव्हेटर, उद्योजक व स्टार्टअप्ससाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज-२०१९’ प्रकल्पाचा शुभारंभ

Share

सातपूर । प्रतिनिधी

नाशिक अभियांत्रिकी क्लस्टर येथे इनोव्हेटर, उद्योजक व स्टार्टअप्ससाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज- २०१९’ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला असून, या माध्यमातून शहरातील नव उद्याजकांसाठी नवा दालन या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने इच्चुकांनी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे संपर्क साधण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.

नाशिक इंजिनिअरिग क्लस्टर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चेअरमन विक्रम सारडा, संचालक नरेंद्र गोलीया संचालक शरद शाह, मुख्य कार्यकारी अधिकारी सूंरेंद्र माथूर, उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) के.एस. पाटील यांनी ही माहिती दिली.

जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी तसेच तांत्रिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार्‍या आणि प्रशिक्षणाद्वारे उद्योग कारखान्यांना कुशल मनुष्यबळ देणार्‍या नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (एनईसी) येथे ‘इनोव्हेशन चॅलेंज २०१९’ ला शासनाद्वारे मान्यता मिळालेली असून, राज्यातील १५ सेंटरमध्ये १४ अभियांत्रिकी महाविद्यालये व नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर हे एकमेव अभियांयांत्रिकी सूविधा पुरवणार्‍या संस्थेची निवड करण्यात आलेली आह

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी बरोबर सामंजस्य करार झालेला असून,डी .एस. कुशवाह ( सी.इ.ओ. महाराष्ट्र शासन ) यांच्या सोबत इन्होवेशन प्रमोशनचा करार नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर चे अध्यक्ष विक्रम सारडा आणि सूरेंद्र माथुर यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर च्या व्हिजन अँड मिशनच्या अनुषंगाने नाशिक  इंजिनिअरिंग  क्लस्टर चे इनोव्हेशन सेंटर अभियांत्रिकी आणि उत्पादन, दळण-वळणाच्या नाविन्यपूर्ण सुविधा, संरक्षण आणि एरोस्पेस, उर्जा व्यवस्थापन, हरित ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण विकास यासारख्या नाविन्यास प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरेंद्र माथुर यांच्या नुसार दि.१५ ते दि.२९ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. यामधून निवडण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण व्यवसायिक औद्योगिक प्रकल्पांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. निवडण्यात आलेल्या व्यवस्थापनांना नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे प्रशिक्षण व त्याशिवाय २ वर्षांच्या सर्वसमावेशक इन्क्यूबेशनची ऑफर देण्यात येईल. या योजनेद्वारे व्यवस्थापनांना नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी सुविधांचा लाभ घेता येईल.

संस्थेच्या जागेमध्ये (co-working space) तसेच उत्पादनासाठी औद्योगिक तज्ञांकडून मार्गदर्शन, कायदेशीरबाबींचे मार्गदर्शन आणि पूर्तता , बौद्धिक संपत्ती (IPR) संरक्षण आणि उत्पादनासाठी गुणवत्ता हमी आणि मार्केट कनेक्ट आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

एनईसीच्या इनोव्हेशन चॅलेंज २०१९ ने विद्यार्थी, शैक्षणिक आणि स्टार्ट -अप आणि नाशिकच्या उद्योजकांमध्ये उत्सुकता निर्माण केलेली असून, नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. सारख्या सार्वजनिक संस्था तसेच नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनने एनईसीच्या इनोव्हेशन उपक्रमात सक्रिय रस दर्शविला असल्याचेही श्री. माथुर यांनी सांगितले.

मुंबई व पुणे येथे इनेव्हेशन सेंटर आधीपासून कार्यरत आहेत, पण नाशिक हे अभियांत्रिकी, ऑटोमोटिव्ह व इलेक्ट्रिकलचे केंद्र असूनही, नवं -उद्योग आणि उद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणारी कुठलीही कार्यप्रणाली उपलब्ध नव्हती, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे हे इनोव्हेशन सेंटर ही उणीव नक्कीच दूर करेल.
– नरेंद्र गोलीया, संचालक नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर

नाविन्य आणि शोधकवृत्ती हे कोणत्याही वय, पात्रता किंवा पार्श्वभूमीशी जोडलेले नाही, त्यामुळेच ‘इनोव्हेशन चॅलेंज-२०१९’ द्वारे सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. नाविन्यपूर्ण कल्पना किंवा उत्पादने असणाऱ्या  विद्यार्थी, शैक्षणिक , स्टार्ट -अप, अगदी कुठलाही उदयोन्मुख सामान्य नागरिक अशा  प्रत्येकाचे या विनामूल्य अभियानात स्वागत आहे. या ‘इनोव्हेशन चॅलेंज-२०१९’ मध्ये भाग घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर च्या संकेत स्थळावर (http://www.nec.org.in/incubation/forms ) अर्ज उपलब्ध आहे. अशा प्रकारे कुठल्याही दुर्गम भागातील उद्योजक व्यक्ती, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो. ग्रामीण भागातल्या उद्योजकांनाही त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना उत्पादन आणि सेवांमध्ये बदलण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी माध्यमांना विनंती केली.
-विक्रम सारडा, चेअरमन नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!