Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकचा पारा ९.८ अंशावर

नाशिकचा पारा ९.८ अंशावर

नाशिक । प्रतिनिधी

देशाच्या उत्तरेकडील केंद्र शासित प्रदेश व शेजारील राज्यात बर्फवृष्टीमुळे या भागातील जनजीवन ठप्प झाले आहे. गेल्या तीन आठवड्यापासून हेच वातावरण असल्याने आलेल्या शितलहरीचा शेजारील राज्यात परिणाम जाणवत आहे. यामुळे विदर्भानंतर उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रकोप जाणवू लागला आहे. चालू हंगामात राज्यात सलग तिसर्‍यांदा सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात ९.८ अंश सेल्सीअस इतकी झाली आहे. या सलग घसरत असलेल्या पार्‍यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे.

- Advertisement -

राज्यात डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर अद्यापही राज्यातील विदर्भ-मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात थंडीचा मुक्काम कायम आहे. यंदा हिवाळ्याच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पारा ५ ते ६ अंशापर्यंत गेला होता. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील पारा ११ ते १२ अंशावर गेला होता.

आता गेल्या दोन दिवसात पारा १५ अंशावरुन थेट ९.८ पर्यत घसरला आहे. या घसरलेल्या तापमानाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. नागपूरनंतर आता नाशिकला गेल्या तीन आठवड्यात आज तिसर्‍यांदा राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुन्हा एकदा  महाबळेश्वरपेक्षा कमी तापमान नाशिक जिल्ह्यात नोंदविले गेले आहे. अशाप्रकारे नाशिक जिल्ह्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे.

गेल्या १ जानेवारी रोजी महाबळेश्वरला मागे टाकत राज्यात सर्वात कमी १०.३ अंश किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली होती.  महाबळेश्वरला १० अंश आणि नाशिकला ९.८ अंश अशा तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात  आर्द्रता ७३ टक्क्यापर्यत गेली होती. गेल्या आठवड्यात पारा खाली येत असल्याने द्राक्षबागाईतदार यांच्यासह सर्वच शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. राज्यात नाशिक पाठोपाठ पुण्यात १२.१ अंश, मालेगांव १३.१, महाबळेश्वर १०, जळगांव १६, औरंगाबाद १५.५, वासीम १५.८, बुलढाणा १४.८, गोदिया १४, यवतमाळ १५.५, सांगली १६.६, कोल्हापूर १६, परभणी १५.५, नागपूर १३.२, गोदिया १४, सातारा १४.५ व सोलापूर १७.६ अशा तापमानाची काल  नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या