Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकपिडीतांना मिळेल‘भरोसा’ चा आधार; आज शरणपूर पोलीस चौकीचे उद्घाटन

पिडीतांना मिळेल‘भरोसा’ चा आधार; आज शरणपूर पोलीस चौकीचे उद्घाटन

नाशिक । प्रतिनिधी 

लैंगिक अत्याचाराला व कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणार्‍या पीडितांच्या सर्वतोपरी मदतीसाठी ‘भरोसा सेल’ची निर्मिती शहर पोलीसांकडून करण्यात आली आहे. त्र्यंबकरोडवरील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या शरणपूर पोलीस चौकी आणि भरोसा सेलचे उद्घाटन सोमवारी (दि.१३) जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते केले जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून भरोसा सेल उभारणीचे काम सुरू होते.

- Advertisement -

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून शहरातील पोलीस चौक्यांचे आधुनिकीकरण केले जात आहे. त्याअंतर्गतच शरणपूर पोलीस चौकीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच, याच परिसरात असलेल्या महिला सुरक्षा विशेष शाखेत पीडित महिलांच्या मदतीसाठीचा ‘भरोसा सेल’ उभारण्यात आल आहे.

या दोन्ही शाखांचे उद्घाटन सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, विजय खरात, पौर्णिमा चौघुले यांच्यासह पोलीस अधिकारी, राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शहरात प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत पाच पोलीस चौक्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहरात ६५ पोलीस चौक्या उभ्या राहत आहेत. या पोलीस चौक्यांची जबाबदारी सहाय्यक निरीक्षक वा उपनिरीक्षकांसह किमान १५ पोलीस कर्मचार्‍यांवर देण्यात आली आहे. एका पोलीस चौकीमध्ये पेट्रोलिंगसाठी तीन दुचाक्या आणि वाहने पुरविण्यात आली आहे.

भरोसा सेलच्या माध्यमातून पीडित महिलांचे पुर्नवसन, कौटुंबिक हिसांचार पीडितांचे संरक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ञ, विधीविषयक सेवा पुरवण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या