Type to search

Featured maharashtra नाशिक

ठरवतं नाही… जे मनात येतं ते करतो

Share
नाशिक | दिनेश सोनवणे
प्रश्नाला डरला, पडला रे पडला, प्रश्नाला भिडला, जिंकला रे जिंकला… म्हणूनच जग म्हणतं उत्तर शोधलं की जगणं बदलतं! पिस्तुल्या, फँन्ड्री, सैराट आणि नाळ चित्रपटांच्या उत्तुंग यशानंतर आता नागराज मंजूळे कोण होणार करोडपती? या विशेष कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणार आहेत. विशेष म्हणजे नागराज यांनी या कार्यक्रमाचे रॅप सॉंगदेखील गायले आहे. त्यांच्या वेगवेगळ्या भुमिकांनी अक्षरशः तरुणाईला वेड लावले आहे या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद
प्रत्येकजन आपल्या आयुष्याची वाटचालताना बर्‍याच प्रश्नांची उत्तरं कळत-नकळत शोधत असतो. कोण होणार करोडपती यातील आपल्या भूमिकेविषयी काय सांगाल?
नागपुरमध्ये शुटींग सुरु असताना सोनी मराठीची टीम मला विचारायला आली होती. त्यांनतर लगेचच होकार देत ही भुमिका साकारण्याचे ठरवले. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून सराव सरु आहे, कधी-कधी शुटींगदेखील असते तिथेही जाऊन सध्या काम चाललं आहे.
कौन बनेगा करोडपती म्हटलं की, अमिताभ बच्चन यांचे चित्र डोळ्यासमोर येते मराठीतला बच्चन साकारण्यासाठी आपण कसा प्रयत्न कराल?
मराठीतला बच्चन वगैरे काही नाही. चांगल काम केलं की पसंती निर्माण होते त्यादृष्टीने वाटचाल सुरु आहे. मन लावून काम सुरु आहे.शोचा फॉरमॅट आधी समजावून घेतला. शो मी स्वतः करत असल्यामूळे त्याची सवय लावून घ्यावी लागत आहे. नक्कीचा चांगलं काम करण्याचा प्रयत्न सुरु आहे, तरीही प्रेक्षकांना मी कसा भावेल हे तर शोनंतरच समजनार आहे.
कोण होणार करोडपतीनंतरची दिनचर्या?
मी टीव्ही-शो पहिल्यांदाच करतोय, त्यामूळे या शोची तयारी वेगवेगळ्या पातळ्यांवर करायला लागते आहे. एरव्ही मी उन्हातान्हात काम करतो, ग्रामीण भागात माझं काम असतं. परंतू या शोमूळे काळजी घेत आहे. तब्बेतीची काळजी घेतोय, त्वचेची काळजी घेतोय. पुरेशी झोप घेतो आहे. शुटींगदेखील आता शेवटच्या टप्प्यात आहे, लवकरच यातून फ्री होईल.
रॅपसॉंगविषयी थोडसं…!
यात ओरीजिनल गायकी नाही. सर्वांची इच्छा होती, म्हणून भुणभुणल्यागत गायल आहे. दोन ओळींचं गाणं (रॅप सांग) आहे ते. यातून गायकाची भूमिका मात्र होणार नाही हे नक्की.
सुत्रसंचालक म्हणून नवी ओळख नावारुपाला येत आहे याविषयी काय सांगाल?
काम करायला सुरुवात तर केली आहे. सुत्रसंचालक म्हणून नागराज प्रेक्षकांना भावतो का?हे मात्र शो सुरु झाल्यानंतरच समजेल.
उत्तर शोधलं की जगणं बदलतं! हीच या शोची टॅगलाईन आहे याबाबत थोडसं?
गावातला माणूस आहे. गावाकडची परिसस्थिती जवळून बघितली आहे. त्यामूळे वेगवेगळे चित्रपट निर्माण झाले. अनेकांचा पावलोपावली प्रश्‍न पडतात…तिथून जगणं बदलतं. आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आपण जी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो त्यामूळेच खर्‍या अर्थाने जगणं बदलत.
लिखाणाविषयी काय सांगाल..
‘उन्हाच्या कटाविरुद्ध ‘काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. माझ्या निवडक कविता यात आहेत. अजूनही वेळ मिळेल तसा अधूनमधून लिखाण करत असतो.
चित्रपटांमधील आपली भुमिका आठवणीत राहते याविषयी काय सांगाल?चित्रपटांचे दिग्दर्शन करताना मला अभिनय करायला आवडतं. त्यामूळे कुठलीतरी छोटीशी भुमिका साकारतो. भूमिका आवडली की प्रेक्षक डोक्यावर घेतात.
चित्रपट दिग्दर्शन, अभिनेता आता सुत्रसंचालकही आपण झालात यापुढील भूमिका कुठली असेल?
असं काही मी ठरवत नाही. जी भुमिका साकारण्याची संधी मिळेल ती मी करतो. पुढे काय होईल माहिती नाही. चित्रपट करेल असं कधी वाटलं नाही, कोण होणार करोडपती करेल असं वाटलं नाही पण हाती मिळालं आहे, तर करायचं असंच म्हणून मी भूमिका साकारतो.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!