Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राज्यातील ३६ दृष्टीबाधीत विद्यार्थीनींना ४ लाख ९२ हजारांंचे शिष्यवृत्ती धनादेश वाटप

Share

सातपूर । प्रतिनिधी

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड महाराष्ट्र व युडीआयएस फोरम कोईम्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यात महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेणार्‍या एकूण ३६ दृष्टीबाधीत विद्यार्थीनींची  शिष्यवृत्तीसाठी मेरीट नुसार निवड करुन एकूण चार लाख ब्यानव्व हजार रुपयांचे शिष्यवृत्तीचे चेक वितरण करण्यात आले.

सातपूर येथील नॅब संकुलाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी रामेश्वर कलंत्री होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती पृथ्वीराज बोरा, युडीआयएस फोरम कोईम्तूर येथून आलेले डॉ. प्रा. श्रीनिवासन, के. शंकररमन, समरसा पंडीयन, विनोद, नॅब महाराष्ट्र मानद महासचिव गोपी मयूर, उपाध्यक्ष सुर्यभान साळुखे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, डॉ. सारंग इंगळे, डॉ. प्राचार्य आश्विनकुमार भारद्वाज आदी मान्यवर व्यासपीठावर होते.मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी युडीआयएसच्या सहकार्याबद्दलची माहिती दिली. अध्यक्ष कलंत्री यांनी नॅब संस्थेची माहिती दिली.

बी. ए. (तिनही वर्ष) २४ विद्यार्थीनीं तर एम.ए. (दोन वर्ष) १२ विद्यार्थीनीं अश्या एकूण ३६ विद्यार्थीनीं बी. ए. करिता प्रत्येकी बारा हजार रुपये मात्र तर एम. ए. साठी अठरा हजार रुपये वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दृष्टीबाधीत विद्यार्थीनींना संगणक यावे म्हणून संगणक शिक्षणा संदर्भात स्पर्धा घेण्यात आली. त्यात अनुक्रमे १९ विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. त्यात पुनम कांबळे प्रथम क्रमांक, तितीक्षा रंगारी द्वीतीय क्रमांक यांना आठ्ठावन हजार रुपयांचे लॅपटॉप भेट देण्यात आले. तर रुक्मीणी राजपूत तृतीय क्रमांक पटकावला या तीलातेरा हजार रुपयांचे डेझी प्लेअर पृथ्वीराज बोरा यांच्या शुभहस्ते देण्यांत आले.

महाराष्ट्रातील ज्या दृष्टीबाधीत लाभार्थी विद्यार्थीनींनी ह्या पुर्वी शिष्यवृत्ती घेवून अभ्यास पुर्ण करुन पदवी प्राप्त केली अशा तीन विद्यार्थीनींनी आपले शिष्यवृत्तीमुळे जीवन कसे बदलले ह्या संबंधीची यशोगाथा सांगितल्या. युडीआयएस फोरमचे मॅनेजिंग ट्रस्टी रमन शंकरन यांनी मार्गा शुल्झे शिष्यवृत्तीची माहिती देवून त्यांचे शिक्षणातील महत्व किती आहे या संदर्भात संस्थेची भूमिका विशद केली. तर विद्यार्थीनी खुप परिश्रम व अभ्यास करुन शिक्षण घ्यावे, स्वत:चे करिअर घडवण्याच्या शुभेच्छा दिल्या.

यांनी लाभार्थीना मार्गदर्शन करुन नँब महाराष्ट्र करित असलेल्या कार्याचा गौरव केला व संस्थेच्या प्रगतीच्या दृष्टीने व त्यानि घेतलेल्या प्रकल्पासाठी योगदान देवून मदत करण्याचे मान्य केले. सुत्र संचालन संस्थेचे सहसचिव मुक्तेश्वर सुनशेट्टीवार यांनी तर आभार गोपी मयूर यांनी मानले. ह्या कार्यक्रमास शिष्यवृत्ती घेणार्‍या मुलींचे पालकही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाल्मिक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!