Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

दिवाळी २०१९ : २४ ऑक्टोबरपासून पासून जादा बसेस; ऑनलाइन आरक्षणाची सुविधा

Share

नाशिक । प्रतिनिधी

दिवाळीमुळे होणार्‍या गर्दीसाठी एसटी महामंडळाने ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला असून, जिल्ह्यांतर्गत धावणार्‍या बसच्या संख्येतही वाढ केली आहे. सर्वाधिक बस या नाशिक-पुणे मार्गावर वाढविण्यात आल्या आहेत. येत्या २४ ऑक्टोंबरपासून १३ डेपोंच्या बसस्थानकांवरून लांब आणि मध्यम पल्ल्यांच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. जादा फेर्‍या दिवाळी हंगामात ३ नोव्हेंबरपर्यत सुरू राहणार आहेत. तसेच प्रवाशांची ऐनवेेळी धावपळ होवू नये, यासाठी एसटीने ऑनलाइन आरक्षणाची सुविधा सुरू केली आहे.

दिवाळीअगोदर एसटीच्या गाड्या निवडणुक कामासाठी राज्य निवडणुक आयोगाने दोन दिवसांसाठी ताब्यात घेतलेल्या आहेत. २१ ऑक्टोंबर पर्यंत शालेय, महाविद्यालयीन परीक्षेचा कालावधीही संपून दिवाळीच्या सुट्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांनाही मतदानानंतर गावी जाण्याचा बेत केलेला आहे. तर दिवाळीनंतर भाऊबिजेसाठी महिलांचीही माहेरी जाण्याची लगबग अधिक असते. या कालावधीत एसटीच्या गाड्यांना जादा प्रवाशी मिळतात. त्यामुळे एसटीने दिवाळी हंगामासाठी यंदा सुमारे १२ दिवस लांब आणि मध्यम पल्ल्यांच्या अंतरासाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

एसटीच्या लांब पल्ल्याच्या गाड्यात नाशिक-औरंगाबाद, नाशिक-पुणे, नाशिक-धुळे आणि नाशिक -मुंबई या अंतरावर अधिक गाड्या रवाना होतात. गेल्या वर्षी एसटीने दिवाळी हंगामात नाशिक-पुणे या अंतरावर सुमारे १६६ जादा फेर्‍या चालविल्या होत्या. या अंतरावर नियमित 66 फेर्‍या असतात. तसेच या अंतरात नाशिक ते पुणे मार्गावरून जाणार्‍या प्रवाशांनापरिवर्तन गाड्या ऐवजी हिरकणी, शिवशाही, शितल आदी गाड्यांची मागणी अधिक असते. नाशिक -औरंगाबाद मार्गावरही ३१ फेर्‍यांचे नियोजन केले आहे. एसटीला जादा गाड्या सोडण्यासाठी मानव विकास अंतर्गत सोडण्यात येणार्‍या विद्यार्थ्यांच्या गाड्याही दिवाळीच्या सुट्यांमध्ये उपलब्ध होणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्या
नाशिक-पुसद, लासलगाव-पुणे, कळवण-पुणे, मालेगाव-पुणे, मालेगाव- अक्कलकोट, नाशिक-सिन्नर-पुणे, नांदगाव-पुणे, येवला-पुणे, पिंपळगाव पुणे अशा गाड्या सोडण्यात येणार आहे.

मध्यम पल्ल्याच्या गाड्या
नाशिक-जळगाव, कळवण-नगर, कळवण- औरंगाबाद, नाशिक-औरंगाबादख, नाशिक-नंदूरबार, नाशिक-चोपडा, नाशिक-कळवण, नाशिक-शिर्डी, कळवण-नगर, पेठ-औरंगाबाद, मालेगाव-नगर, मालेगाव-औरंगाबाद, नाशिक-नंदूरबार, सटाणा नंदूरबार, सटाणा-चाळीसगाव, सिन्नर-नाशिक-नगर, नाशिक-चाळीसगाव, नांदगाव-पाचोरा, नांदगाव-नगर, इगतपुरी-चोपडा, इगतपुरी-नंदूरबार, लासलगाव तुळजापूर अशा गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!