Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत नाशिकचा झेंडा

Share
पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत नाशिकचा झेंडा : MPSC Exam Results

एनटी-सी प्रवर्गात मुलींमध्ये अश्विनी पडवळे प्रथम

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मंगळवारी दुपारी पीएसआय परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. या परीक्षेत नाशिकचे ३५ हून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. अश्विनी पडवळे हिने एनटी-सी प्रवर्गात मुलींमध्ये प्रथम, प्रियंका बागुल हिने एसटी प्रवर्गात तृतीय तर फरहानज पटेल हिने मुलींमध्ये सहावा क्रमांक पटकावला.

राज्यभरातील एकूण ३८७ पदांसाठी २०१८ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. लेखी परीक्षेच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी १ हजार ६५९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर मुलाखती व शारीरिक चाचणी यांच्या आधारे १७ मार्चला दुपारी अंतिम निकाल जाहीर झाला.

स्पर्धा परीक्षांमध्ये मागील काही वर्षांपासून नाशिकच्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. ही परंपरा या निकालातही कायम राहिली असून अनेक विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

याशिवाय मनोज टिपले, सागर गाडीलोहार, महेश नजन, गोकुळ खैरनार, नीलेश बच्छाव, विशाल सपकाळे, भूषण देवरे, प्रकाश वखारे, प्रदीप बोर्‍हाडे, अभिजित अहिरे, जितेंद्र वालटे, राहुल पाटील, सतीश आहेर यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. दरम्यान, वैभव नवले हा पहिला, ज्ञानदेव काळे दुसरा तर भाऊसाहेब दहिफळे हा राज्यात तिसरा आला. या यादीत दीपाली कोळेकर हिचा चौथा क्रमांक आहे. मात्र ती राज्यात मुलींमध्ये पहिली आली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!