Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर-धामणगाव-घोटी राष्ट्रीय महामार्ग ( क्र. १६० अ ) च्या कामाचा खासदार हेमंत...

सिन्नर-धामणगाव-घोटी राष्ट्रीय महामार्ग ( क्र. १६० अ ) च्या कामाचा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते शुभारंभ

इगतपुरी । प्रतिनिधी

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय नितीन गडकरी व केंद्र शासन यांच्या माध्यमातून खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून सिन्नर-पांढूर्ली, आगसखिंड-धामणगाव, घोटी-त्र्यंबकेश्वर रस्ता राष्ट्रीय ( क्र. १६० अ ) महामार्गाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते रविवार ( दि. २४ ) दुपारी एक वाजेदरम्यान भूमिपूजन समारंभ करण्यात आला.

- Advertisement -

सदर महामार्गावर खड्ड्यांच्या साम्राज्याने दळणवळणाचा जटील प्रश्न निर्माण झाला होता. दोन जिल्ह्यांना जोडणारा महामार्गावर शिर्डी-शनिशिंगणापूरला जाणारे भाविक, अथवा पर्यटनस्थळांवर जाणाऱ्या पर्यटकांना विविध समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली होती. तसेच परिसरातील व्यवसायिक, कामगार, शेतकरी हतबल झाले होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय अंतर्गत या महामार्गासाठी २०५८.२३ लक्ष रुपये निधीची तरतूद खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याने व नियंत्रण प्राधीकरण राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक यांच्या सहकार्याने पूर्णत्वास आले. ५० किलोमीटरचे कामकाज पूर्णत्वास झाले असून उर्वरित कामकाज एका महिन्याच्या आत होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता विवेक माळोदे यांनी दिली.

यावेळी महामार्गाचे कार्यकारी अभियंता विवेक माळोदे, उपअभियंता सी. आर. सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, पंचायत समिती सदस्य विमल गाढवे, विष्णुपंत गोडसे, संदीप जाधव, विलास आडके, कचरू पा. डुकरे, मधु पा. कोकणे, तुकाराम सहाणे, हरिष चौबे,समाधान वारुंगसे, शिवाजी गाढवे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या