Friday, April 26, 2024
Homeनाशिककरोनाशी मुकाबला करताना मृत्युमुखी पडलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना ‘शहीद’ दर्जा देण्यात यावा- आमदार...

करोनाशी मुकाबला करताना मृत्युमुखी पडलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना ‘शहीद’ दर्जा देण्यात यावा- आमदार देवयानी फरांदे

नाशिक । प्रतिनिधी

सध्या जगभर करोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू असून राज्यात देखील पोलीस विभाग आरोग्य विभाग व इतर शासकीय विभागातील कर्मचारी या संकटाशी प्राणपणाने मुकाबला करीत आहे. करोनाशी लढत असताना काही कर्मचाऱ्यांना दुर्दैवाने या आजाराची लागण होऊन त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे.

- Advertisement -

करोना महामारी संघर्ष हे जणू युद्धच असून यात जीवाची पर्वा न करता आजारी रुग्णांचा उपचार करणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी, नागरिकांना हा आजार होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवणारे पोलीस कर्मचारी, नागरिकांना आवश्यक ती मदत करून देणारे महसूल कर्मचारी किंवा नागरिकांचे नियमित जीवन योग्य प्रकाराने चालवण्यासाठी परिश्रम घेणारे महानगरपालिकेचे कर्मचारी व इतर शासकीय कर्मचारी हे देशसेवाच करीत असून सदर कर्तव्य बजावत असताना त्यांना करोना आजाराने आजारी व्हावे लागले व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून शहीद समजले जावे व त्यांच्या कुटुंबियांना त्याबाबत आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी मागणी आज आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेऊन केली .

यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे व मनीष जेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या