Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक औद्योगिक क्षेत्रात साडेचार हजार उद्योगांची चाके गतिमान

नाशिक औद्योगिक क्षेत्रात साडेचार हजार उद्योगांची चाके गतिमान

दोन शिफ्टमध्ये काम करण्यास मुभा

सातपूर । प्रतिनिधी

- Advertisement -

उद्योग क्षेत्रातील उत्पादन प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती मिळू लागली असून आजपर्यंत सुमारे साडेचार हजार उद्योगांनी उत्पादन सुरू केले आहे कामगारांच्या बारा तासाच्या शिफ्ट ऐवजी आता दोन शिफ्टमध्ये काम करता येणे शक्य असल्याने उद्योगांच्या कामाला गती मिळण्यास सोबत बहुतांश कामगारांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

लॉक डाऊनच्या संकटानंतर उद्योगक्षेत्राला गती देऊन अर्थव्यवस्थेला आधार देण्याचा प्रयत्न शासनाने सुरू केला या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात बारा तासाची शिफ्ट करून कमी लोकांना कामावर बोलण्याचं मार्गात घेण्यात आला होता मात्र कामाला गती देण्याच्या उद्देशाने शासनाने या नियमात सुधारणा करत आठ तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे मनुष्यबळाला पूर्वी मर्यादा घालण्यात आलेली होती ती रद्द करण्यात आली आहे मात्र शासनाने नेमून दिलेल्या अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यानुसार प्रमुख्याने कारखान्यात सोशल डिस्टन्सीग ठेवणे, दोन शिफ्टमध्ये दोन तासाचे अंतर असावे, सँनिटायझर मास्क यांचा वापर असावा नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नाशिक औद्योगिक क्षेत्रात असलेल्या उद्योगांपैकी ७३०० उद्योगांनी उद्योग सुरू करण्याची परवानगी घेतलेली असून ४५०० उद्योग उत्पादन प्रक्रिया गतिमान झाले आहेत. या माध्यमातून सत्तर ते ऐंशी हजार कामगारांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
-नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी

कामगार एकजुटीचा विजय
कामगार संघटनांच्या माध्यमातून सातत्याने १२ तासाचे काम बंद करावे व शिफ्टमध्ये आठ तासाची काम कामगारांना द्यावे अशी मागणी मागण्यात आली होती याबाबत मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले होते नव्या नियमात त्याचा अंतर्भाव झालेला असल्याने कामगार वर्गाला न्याय मिळाला.
सिटू प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी एल कराड

शिफ्टमध्ये काम करावे
उत्पादन गती देताना कामगार कायद्यांचे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून उत्पादन करावे बारा ऐवजी आठ तासाच्या शिफ्टमध्ये काम करावे
तुषार चव्हाण ,सरचिटणीस निमा

- Advertisment -

ताज्या बातम्या