Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘प्रिस्क्रिप्शन’चे होणार ऑडिट; आरोग्यसेवा संचालनालयाचा निर्णय

Share

नाशिक । प्रतिनिधी

डॉक्टरांकडून दिल्या जाणार्‍या प्रिस्क्रिप्शनची गुणवत्ता टिकवण्यासाठी त्याचे ऑडिट करण्याचा निर्णय आरोग्यसेवा संचालनालयातर्फे घेण्यात आला आहे.

चुकीच्या प्रिस्क्रिप्शनमुळे प्रतिजैविक प्रतिकार (अँटिबायोटिक रेजिस्टन्स) टाळण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय अधिकार्‍यांनी आठवड्यातून किमान एकदा प्रिस्क्रिप्शन ऑडिट करून त्याची नोंद संस्थास्तरावर उपलब्ध करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉक्टरांकडून दिल्या जाणार्‍या प्रिस्क्रिप्शनची गुणवत्ता टिकवण्यासाठी त्याचे ऑडिट करण्याचा निर्णय आरोग्यसेवा संचालनालयातर्फे घेण्यात आला आहे. रुग्णांना आवश्यक आणि योग्य प्रमाणात औषधे उपलब्ध करणे गरजेचे असताना वैद्यकीय अधिकार्‍यांनी योग्य प्रिस्क्रिप्शन देणेही अत्यावश्यक असते. याच जोडीला आता सर्व प्रिस्क्रिप्शनचे ऑडिट होणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यासाठी सर्व आरोग्यसेवा उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना आरोग्यसेवा संचालनालयाकडून एकूण ११ मुद्यांची सूचनावली पाठवण्यात आली आहे. यामध्ये सर्व तपशील आणि औषधांची नावे सुवाच्च आणि वाचनीय हस्तलेखनात लिहिली गेली पाहिजे,

डॉक्टरांचा सल्ला आवश्यक तपासणी म्हणून ग्राह्य धरावा, अशा सूचनांचा समावेश आहे. हे ऑडिट नॅशनल क्वालिटी अ‍ॅशुरन्स स्टॅण्डर्डसाठीही आवश्यक असणार आहे. तसेच संबंधित अधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांचे प्रिस्क्रिप्शन ऑडिट करून अहवाल संचालनालयाला सादर करावेत, अशा सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!