Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय

Share
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय; Measures to increase immunity

नाशिक । प्रतिनिधी

करोना विषाणूचा देशभर प्रादुर्भाव वाढत आहे. करोनापासून बचावासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असली तरी याचा संसर्ग जलदगतीने भारतासह इतर देशांत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर करोनापासून दूर राहता येते, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.

नियमित आहारात व्हिटॅमिन सीयुक्त सीडस् फळे, लिंबू, मोसंबी, संत्री, आवळा, टोमॅटो आदींचा समावेश केला गेला पाहिजे. यासोबतच झोप प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाची असून पुरेशी झोप घेतली गेली पाहिजे. आले घालून तयार केलेला चहा प्यायला पाहिजे. तसेच जेवणातही आल्याचे प्रमाण रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

आतड्यातील बॅक्टेरिया बाहेर काढण्यासाठी दैनंदिन आहारात दही, ताकाचा समावेश केला पाहिजे. परंतु दही आणि ताकाचे प्रमाण रात्रीच्या जेवणात अधिक प्रमाणात असू नये, असेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. रोजच्या आहारात फळे आणि हिरव्या भाज्या असायला हव्यात.
व्यायाम, योगा, प्राणायाम आदी रोज अर्धा तास तरी केला पाहिजे. शरीरातील पाण्याची पातळी प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे तहान लागल्यावर पाणी प्यायले पाहिजे. तसेच दिवसभरात किमान ६ ते ८ ग्लास पाणी प्यायला हवे.

अरेबिक युनानी उपचार पद्धतीने उपचार घेणार्‍या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. ही औषधे मुख्यत: वनस्पतींपासून तयार करतात. काही युनानी औषधे खनिज किंवा प्राण्यांपासून बनवलेली आहेत. यकृत विकारावर प्राण्यांच्या यकृताचा अर्क तर मानसिक विकृतीवर मेंदूचा अर्क देतात. रोगाच्या अगदी तीव्र अवस्थेतच शुद्ध विषारी औषधे वापरतात. संसर्गजन्य रोगांपासून वाचण्यासाठी युनानी उपचारपद्धती गुणकारी आहे.
डॉ. सादिक शेख, युनानी

आजारपणात प्रतिबंधात्मक औषधे घ्यायलाच हवीत. होमिओपॅथी उपचारपद्धती अवलंबणारे रुग्ण तंदुरूस्त असतात. त्यांची रोगप्रतिकार शक्ती अधिक असते. त्यामुळे अशा रुग्णांना विषाणू जडण्याची भीती नसते. तरीदेखील लक्षणे आढळली तर वैद्यकीय सल्ल्याने औषधे घेतली गेली पाहिजेत.
डॉ. मनीषा शिंदे, होमियोपॅथी

करोनासारख्या भयंकर विषाणूपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. सध्या या व्हायरसवर उपाय सापडला नसला तरीदेखील सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे. शासनाच्या गाईडलाईन्स फॉलो केल्या पाहिजेत. गर्दीत जाऊन संसर्ग ओढवून घेण्यापेक्षा सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये.
डॉ. वैभव पाटील, अ‍ॅलोपॅथी

गर्दी टाळूया, कोरोनाला हद्दपार करूया
सध्या भारत देश कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या टप्यात असून याचा अटकाव करायचा असेल तर महत्वाचा उपाय म्हणजेच गर्दी टाळणे होय. दुसर्‍या स्टेजमध्ये आपण असून पुढील पायरी भयावह असून त्यासाठी आपण सहकार्य करणे गरजेचे आहे. स्वतःला आयसोलेशन मध्ये ठेऊन प्रसार टाळू शकतो. भारतात सध्या हा व्हायरस आऊट ब्रेक झाला असून याचा प्रतिकार म्हणजे एकमेकांशी संपर्क टाळूया. जेणेकरून गर्दी झाली नाही तर आपोआप व्हायरसही पसरणार नाही. त्यामुळे गर्दी न करणे आपल्या सर्वांसाठी हितकारक आहे.
डॉ. प्रशांत देवरे, आयएमए

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!