Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकमनमाडला चक्रीवादळासह पावसाचा तडाखा

मनमाडला चक्रीवादळासह पावसाचा तडाखा

मनमाड । प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मनमाड शहर परिसरा सोबत ग्रामीण भागाला देखील मोठ्या प्रमाणात बसला असून बुधवारी रात्री जोरदार पावसा सोबत वादळी वारा देखील होता त्यामुळे झाडे कोलमडली,कांदाचाळी उध्वस्त झाल्या टर उभ्या पिकांचे ही मोठे नुकसान झाले.सुमारे ३० विजेचे खांब पडल्याने शहरा सोबत ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.चक्री वादळामुळे वित्तीय हानी झाली असली तरी मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत पावसाने दमदार हजेरी लावल्याने तापमान मोठी घट झाली त्यामुळे गेल्या 3 महिन्या पासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

- Advertisement -

निसर्ग चक्री वादळ मनमाड शहर परिसरात काल सायंकाळीचा दाखल झाला होता.वादळ दाखल होण्या अगोदर पावसाने दुपार पासून हजेरी लावली होती मात्र सायंकाळी वाऱ्या सोबत पावसाचा ही जोर वाढलेला होता.रात्री ९ वाजे नंतर सोसाट्याचा वाऱ्या सोबत मुसळधार पाऊस सुरु झाला.सुमारे दीड तासा नंतर वाऱ्याचा वेग कमी झाला मात्र पावसाचा जोर कायम होता.काही वेळा नंतर पावसाचा जोर कमी झाला मात्र पहाटे पर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती.वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोलमडली,

कांदा चाळी देखील पडल्याने त्यातील कांदा भिजून खराब झाला.इतर शेतमालाचे ही नुकसान झाले तर उभ्या पिकांना देखील पावसाचा फटका बसला.शहर परीसरा सोबत ग्रामीण भागात ठिकठिकाणी ३० विजेचे खांब कोसळले असून जागोजागी विजांच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे संपूर्ण शहर रात्रभर अंधारात बुडाले होते.विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विज वितरण कंपनीचे ३२ अधिकारी कर्मचारी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करीत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या