Monday, May 6, 2024
Homeनाशिकमनमाड, नांदगाव येथून ६ एसटी बसच्या माध्यमातून २२५ मजूर नाशिकला रवाना

मनमाड, नांदगाव येथून ६ एसटी बसच्या माध्यमातून २२५ मजूर नाशिकला रवाना

मनमाड । प्रतिनिधी

लॉक डाऊनमुळे मनमाड शहरासह नांदगांव तालुक्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी शासनाने तर्फे एसटी बसची व्यवस्था करण्यात आल्यानंतर आज ६ एसटी बसच्या माध्यमातून सुमारे २२५ मजुरांना नाशिकला रवाना करण्यात आले असून तेथून श्रमिक रेल्वे ने आपापल्या गावी जाणार आहे.तब्बल ५५ दिवसा पासून हे मजूर अडकलेले होते अखेर आज त्यांच्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आल्याचे पाहून त्यांना केवळ मोठा दिलासाच मिळाला नाही तर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

- Advertisement -

सध्या कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला असून या महामारीने अनेकांचा बळी घेतला आहे तर लाखो लोक त्याच्या विळख्यात सापडले आहे.भारतात देखील कोरोनाने थैमान घातले आहे याचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केंद्र शासनाने २२ मार्च पासून देश भरात लॉक डाऊन लागू केल याचा फटका इतर घटका सोबत लाखो परप्रांतीय मजुरांना देखील बसला.राज्यातील वेगवेगळ्या भागा प्रमाणे मनमाड शहर व नांदगाव तालुक्यात देखील शेकडो मजूर अडकून पडले होते.

मनमाड शहरात या मजुरांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था पालिका प्रशानाने तर नांदगाव तालुक्यात महसूल विभाग व पालिका प्रशासना तर्फे करण्यात आली होती.यात गुरुद्वारा,सामाजिक संस्था,दानशूर व्यक्ती यांनी देखील मोलाची मदत केली.राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तरी शेवटी घर हे घर असत त्यामुळे या मजुरांना देखील घरी जाण्याची ओढ लागलेली होती त्यामुळे त्यांचे लक्ष लागले होते ते शासनाच्या निर्णयाकडे.

अखेर शासनाने या मजुरांसाठी श्रमिक एक्स्प्रेस नावाने रेल्वे सोडण्यास सुरुवात केली.लवकरच नाशिक येथून आणखी एक विशेष ट्रेन विविध राज्यांच्या मजुरासाठी सोडली जाणार आहे त्यामुळे मनमाड शहर व नांदगाव तालुक्यात अडकेल्या मजुरांना या ट्रेन मधून जाता यावे यासाठी आज त्यांना मनमाड येथून ६ एसटी बस मधून रवाना करण्यात आले अगोदर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर त्यांची थर्मल स्क्रीनिग करून त्यांना जेवणाचे पाकीट व पाणी देण्यात आले.

यावेळी तहसीलदार योगेश जमधाडे,मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेणकर,यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.एसटी मधून नाशिकला गेल्यानंतर श्रमिक ट्रेन मधून हे सर्व मजूर आपापल्या गावाकडे जाणार आहे गेल्या अनेक दिवसा पासून अडकलेल्यानंतर आज गावी जाण्याचा योग आल्याचे पाहून एसटी बस मध्ये बसल्या नंतरया मजुरांना आनंदाश्रू अनावर झाले होते

- Advertisment -

ताज्या बातम्या