Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमनमाड रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना मोफत जेवणाचे पाकीटे वाटप

मनमाड रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना मोफत जेवणाचे पाकीटे वाटप

मनमाड । प्रतिनिधी

परप्रांतीय मजुरांना घेवून पुणे येथून बिहारकडे जाणाऱ्या श्रमिक या विशेष रेल्वे गाडीतील सुमारे १ हजार २०० मजूर प्रवाशांना मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या वाणिज्य विभागातील कर्मचाऱ्या कडून स्वखर्चाने मोफत जेवणाचे पाकीट आणि पाण्याच्या बाटल्या देवून माणुसकी जोपासण्यात आली.

- Advertisement -

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात उत्तर प्रदेश,बिहार,राजस्थान,मध्य प्रदेश आदी राज्यातील लाखो मजूर काम धंद्यासाठी आलेले होते मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केंद्र सरकार तर्फे २२ मार्च पासून देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे हे सर्व मजूर अडकून पडले होते.तब्बल दोन महिन्या पासून लॉक डाऊन असल्याने या मजुरा जवळ असलेले सर्व काही संपल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती

त्यामुळे आम्हाला आमच्या गावाला जावू द्या अशी जोरदार मागणी या मजुरांनी केली काही तर पायी काही सायकलीवर तर काहींनी रेल्वे रुळावरून देखील गावाची वाट धरली होती अखेर राज्य व केंद्र शासनाने याची दखल घेत या मजुरासाठी श्रमिक ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलं.गेल्या काही दिवसा पासून पुणे,मुंबई येथून सोडण्यात येत असलेल्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्या ह्या मनमाड मार्गे धावू लागल्या आहेत आज पुणे येथून बिहारला जाणाऱ्या या विशेष गाडीतील १२०० मजुरांना रेल्वेच्या वाणिज्य विभागातील कर्मचाऱ्या तर्फे स्वखर्चाने मोफत जेवणाचे पाकीट आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.गाडीत अनेक महिला आणि लहान मुळे देखील होते .

जेवणाचे पाकीट आणि पाण्याच्या बाटल्या मिळताच त्यांना मोठा दिलासा मिळाला व त्यांनी जेवण-पाणी देणाऱ्या या रेल्वे कर्मचाऱ्याचे आभार मानले.मनमाड वाणिज्य विभागाचे निरीक्षक नाना भालेराव यांच्या नेतृताखाली राबविण्यात आलेल्या माणुसकी जोपासणारया या उपक्रमात आनंद गांगुर्डे,स्नेहल सोनवणे,उमेश मढे,मुकेश सनानसे,पवन आहेर,रितेश पळशीकर,प्रविण भालेराव,हिरा काळे,पी के राईकवार,मनोज बोरसे,जितेंद्र जाधव,नितीन पिंगट,दीपक सरोदे,दीपक शिंदे,महेश माळी,कपिल मरीयन,मनीष ठाकूर,रवी पगार,गनेश जाधव आदी कर्मचारी सहभागी झाले होते

- Advertisment -

ताज्या बातम्या